Type Here to Get Search Results !

जनता आणि प्रशासनामध्ये सेतू म्हणून काम करणार : आमदार सिद्धार्थ खरात जनतेच्या आवाजाला मिळाले आमदारांचे उत्तर — “लोकशाहीचा खरा उत्सव

 

मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज



 लोणार दि. ३० :

लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली आज भव्य जनता दरबार पार पडला. नागरिकांच्या समस्या थेट आमदारांसमोर मांडण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दरबार गजबजवला जनता आणि प्रशासनामध्ये सेतू म्हणून काम करणार असल्याची ग्वाही आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली.



रस्ता, घरकुल, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, वीज, तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील विलंब या विषयांवर नागरिकांनी खुलेपणाने मते मांडली. प्रशासनातील निष्क्रीयतेबद्दलही अनेकांनी थेट आवाज उठविला.



जनता दरबारात उपस्थित अधिकारी नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीकडे लक्षपूर्वक ऐकून घेत होते. आमदार सिद्धार्थ खरात यांनी सर्व मुद्द्यांची गंभीर दखल घेत सखोल चौकशी करून त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले.

 जनता दरबार हा फक्त ऐकण्यासाठी नव्हे, तर उत्तरदायित्वाची नवी दिशा ठरविण्यासाठी आहे. प्रत्येक प्रश्न हा शासनाच्या तिजोरीतून उत्तर मागतो आणि आम्ही ते उत्तर मिळविण्यास कटिबद्ध आहोत,”असे यावेळी आ. सिद्धार्थ खरात बोलले.


अधिकाऱ्यांची उपस्थिती


दरबारास उपविभागीय अधिकारी (महसूल) रवींद्र जोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रदीप लोलुरे, तहसीलदार डॉ. भूषण पाटील, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, मुख्याधिकारी रामराजे कापरे, दुय्यम निबंधक कैलास गाढे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्याम मोरे, उपअभियंता चंद्रकांत खडसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गाडेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वैभव मापारी, लोणार डेपो मॅनेजर राजेंद्र सानप यांसह संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 पक्ष व स्थानिक प्रतिनिधींची हजेरी 



जनता दरबारात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छीरे, तालुका समन्वयक तेजराव घायाळ पाटील, तालुका अध्यक्ष राजेंद्र बुधवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सदानंद पाटील, महिला आघाडी तालुका प्रमुख तारामती जायभाये, युवा तालुका अध्यक्ष जिवन घायाळ पाटील, तसेच दाभा सर्कल प्रमुख विजय मोरे, गजानन मोरे, गजानन जाधव, श्रीकांत नागरे, प्रविण सरदार, बंडू जोगदंड, स्वप्निल हाडे, संजीवनी वाघ, भगवानराव चेके, समाधान साळवे, सुदन अंभोरे, परमेश्वर दहातोंडे, राजू दहातोंडे यांच्यासह शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


१५ नोव्हेंबरला आढावा बैठक


दरबारात मांडलेल्या मुद्द्यांवर १५ नोव्हेंबर रोजी विशेष आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची घोषणा आमदारांनी केली.

Post a Comment

0 Comments