जनता दरबारात आलेल्या सर्व तक्रारी व समस्या एका महिन्यात मार्गी लावणार:आमदार सिद्धार्थ खरात आमदार जनता दरबारात हजारो तक्रारींचा पाऊस
मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज
मेहकर:गजानन राऊत
मेहकर, दि. ३१
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पुढाकाराने आज मेहकर येथे झालेल्या भव्य जनता दरबारात नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून विविध तक्रारी, अडचणी आणि मागण्या मांडल्या. या दरबारात तक्रारींचा अक्षरशः ढीग साचला असतानाच, सर्व तक्रारींचे त्या त्या विभागाकडे वाटप करून एक महिन्याच्या आत समाधानकारक उत्तरे दिली जातील, अशी ग्वाही आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली.
हा जनता दरबार मेहकर येथील कृषी वैभव लॉन येथे पार पडला. सभागृहात शेतकरी, महिला, नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. आपल्या मनमोकळ्या भाषणात आमदार खरात म्हणाले, “जनता दरबाराचा उद्देश प्रशासनाला धारेवर धरणे नाही, तर जनतेच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवून मार्ग काढणे आहे. प्रशासन हे आपले शत्रू नाही, तर जनतेची सेवा करणारे घटक आहेत. मात्र, कामे वेळेवर न झाल्याने नागरिक नाराज आहेत. त्यामुळे जनता आणि प्रशासन यांच्यात सुसंवाद घडवून आणण्याचा माझा प्रयत्न आहे.”
ते पुढे म्हणाले, “प्रत्येक तक्रारीच्या मागे एक माणूस नव्हे, तर एक कुटुंब असते. आपल्या हातातील ८० ते ९० टक्के कामे तुमच्या स्तरावरच पूर्ण होऊ शकतात. जनतेचा मान राखा, अन्यथा मी कोणाचीही गय करणार नाही.”
दरबारात अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई, विहिरींचे पंचनामे, सौर ऊर्जा पंप बंद पडणे, शेत रस्ते व पांदण रस्त्यांचे प्रश्न, शेतजमिनींच्या अनुदानाबाबतची अडचण अशा अनेक तक्रारी मांडण्यात आल्या.
यावर आमदार खरात यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, “विहिरींच्या नुकसान भरपाईसाठी नरेगा अंतर्गत कामे तातडीने सुरू करा व पाठपुरावा करा.”
तहसीलदार निलेश मडके यांनी माहिती दिली की, मेहकर तालुक्यातील ५८३ विहिरींचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
रस्त्यांबाबत अधिकाऱ्यांनी ‘प्रस्तावित आहेत’ अशी उत्तरे दिल्यावर आमदार खरात संतप्त झाले आणि म्हणाले, “जनतेला प्रस्तावित आहे याचा अर्थ कळत नाही, त्यांना काम कधी होणार हे सांगा.”
एका शेतकऱ्याने सौर पंप कंपनीच्या निष्काळजीपणाबद्दल तक्रार केली असता आमदारांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी विरेंद्र कळसकर यांना विचारणा केली. त्यांनी “कोणी अधिकारी आले नाहीत” असे सांगताच आमदार खरात यांनी संताप व्यक्त करून तातडीने संपर्क साधण्याचे आदेश दिले.
शेतकऱ्यांनी पूर्णपणे खरडून गेलेल्या जमिनींना पाच वर्षे अनुदान मिळत नाही, अशी तक्रार मांडल्यावर आमदार खरात म्हणाले, “हा गंभीर विषय आहे





Post a Comment
0 Comments