Type Here to Get Search Results !

लोकजागर ' वृत्तदर्पण पुरस्कार' जाहीर: लेखणीतून समाजप्रबोधन करणाऱ्या पत्रकारांचा यथोचित गौरव!




बुलढाणा:प्रतिनिधी गजानन राऊत


पत्रकार रफीक कुरेशी, कैलास राऊत , समाधान म्हस्के 

ठरले मानकरी.







महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि लोकपरंपरा जतन करण्याच्या उदात्त हेतूने गेली ४० वर्षे सातत्याने कार्यरत असलेल्या हिवरा आश्रम (ता. मेहकर, जि. बुलढाणा) येथील 'लोकजागर सांस्कृतिक कला मंच विवेकानंद' संस्थेने यंदापासून पत्रकारिता क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करण्याचा एक स्तुत्य पायंडा पाडला आहे. कर्मयोगी शुकदास महाराज यांच्या जयंतीच्या पवित्र पर्वावर, आतापर्यंत शाहीर, कीर्तनकार आणि कलावंतांना गौरवणारी ही संस्था, या वर्षापासून 'लोकजागर वृत्तदर्पण पुरस्कार' देऊन समाजाला नवी दिशा देणाऱ्या पत्रकारांच्या कार्याची दखल घेणार आहे. यावर्षीचे पहिले मानकरी रफिक कुरेशी, कैलास राऊत आणि समाधान मस्के हे ठरले असुन

'लोकजागर लोककला मंच हिवराश्रम'चे अध्यक्ष तथा लोकशाहीर ईश्वर मगर यांनी काल, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी या प्रतिष्ठेच्या 'लोकजागर वृत्तदर्पण पुरस्कारा' २०२५ची घोषणा केली असुन. आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजामध्ये उत्कृष्ट आणि प्रभावी कार्य करणाऱ्या तीन ज्येष्ठ व युवा कर्तृत्ववान पत्रकारांना या पुरस्काराचे पहिले मानकरी होण्याचा बहुमान मिळाला आहे.यामध्ये दै.सकाळचे ता . प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार तथा सिनेअभिनेते  रफिक कुरेशी , तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा'दै.बातमी जगत'चे मुख्य संपादक  कैलास राऊत (देऊळगावकर) 

 व  'दै. देशोन्नती'चे हिवरा आश्रम येथील प्रतिनिधी समाधान मस्के पाटिल 

या तिन्ही पत्रकारांच्या कार्याची दखल घेत  संस्थेचे अध्यक्ष लोकशाहीर ईश्वर मगर यांनी हे पुरस्कार जाहीर केले आहेत. 

समाजात लेखणीच्या माध्यमातून 'लोकजागर' घडवणाऱ्या या पत्रकारांना मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे  स्वरूप असणार असून.

हा भव्य गौरव सोहळा दि.१७ नोव्हेंबर २०२५ रोजी कर्मयोगी शुकदास महाराज जयंतीच्या शुभ पर्वावर, विवेकानंद आश्रमा भव्य रंगमंचावर, हिवरा आश्रम, ता.मेहकर, जि. बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. कला क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते, पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या  या तिन पत्रकारांना हा पुरस्कार सन्मानजनक प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्काराच्या माध्यमातून 'लोकजागर' संस्थेने कला आणि पत्रकारिता या दोन्ही समाज प्रबोधनाच्या महत्त्वपूर्ण स्तंभांना एकाच व्यासपीठावर आणून, त्यांच्या योगदानाला यथोचित न्याय दिला आहे. या पुरस्काराबद्दल मानकरी ठरलेल्या सर्व पत्रकारांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


Post a Comment

0 Comments