Type Here to Get Search Results !

मेहकरात 37,938 मतदार ठरवणार नगराध्यक्ष पदाचा विजयी उमेदवार तालुका क्रीडा संकुलात 3 डिसेंबरला मतमोजणी

 मेहकरात 37,938 मतदार ठरवणार नगराध्यक्ष पदाचा विजयी उमेदवार

तालुका क्रीडा संकुलात 3 डिसेंबरला मतमोजणी


मेहकर:गजानन राऊत



मेहकर नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जोगी यांनी 8 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपरिषद सभागृहात आयोजित पत्रकार परिषद निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला यावेळी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 10 ते 17 नोव्हेंबर दरम्यान नगरपरिषद कर विभागात पार पाडणार आहे 18 नोव्हेंबरला अर्जाची छाननी होईल तर 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत दिली जाईल 26 नोव्हेंबरला चिडण्याचे वाटप होईल 2 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचवाजे पर्यंत, मतदार होणार असून तीन डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता तालुका क्रीडा संकुलनात मतमोजणीला सुरुवात होईल मेहकर शहरात एकूण 37,938 मतदार असून, त्यापैकी पुरुष मतदार 19,288,महिला 18,649 आणि इतर एक मतदार आहे एकूण 44 मतदार केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे मेकर परिषद ब वर्ग असल्याने नगराध्यक्ष पदासाठी खर्च मर्यादा 11 लाख 25 हजार रुपये तर नगरसेवक पदासाठी साडेतीन लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रियेत सहभागी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण डीपी रोडवरील लायब्ररीत घेतले जाणार आहे आदर्श आचार संहितेच्या पालनासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली असून सर्व निवडणूक प्रक्रिया पारदर्श आणि शांततेत पार पाडावी यासाठी उपाययोजना केल्या आहेत 

ऑब्झर्व्हर म्हणून जि प गुलाबराव खरात यांची नियुक्ती

मेहकर नगरपरिषद निवडणुकीसाठी ऑब्झर्व्हर म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे नागरिकांच्या सोयीसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे पत्रकार परिषदेस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्य अधिकारी रामराजे कापरे नायब तहसीलदार प्रवीण देशमुख लेखापाल धनाजी साळुंखे करअधीक्षक सुधीर सारोळकर बांधकाम अभियंता किशोर ढेपले विलास जवंजाळ विलास दाभाडे विशाल शिरपूरकर अनिल मुळे सय्यद अख्तर प्रकाश सौभाग्य संजय खोडके आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments