मेहकर नगरपालिकेसाठी तीनशेहून अधिक उमेदवार इच्छुक आठवड्याभरात वीस लाखाचा कर जमा
खुर्चीचा मानकरी कोण सर्वत्रचर्चा
मेहकर बुलेटिन बुलेटिन न्युज
मेहकर नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्याने सध्या मेहकर नगरपालिका कडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे केंद्रीय मंत्री आजी-माजी आमदाराचे शहर आहे त्यामुळे येथील निवडणूक आहे हाय व्होल्टेज होणार आहे त्यांची प्रचिती इच्छुक, उमेदवारांनी भरलेल्या करा मधून आली आहे ३००पेक्षा जास्त इच्छुकांनी कराचा भरणा केला असून अजूनही भरणा सुरूच आहे त्यामुळे आणखी इच्छुकांची गर्दी होणार असल्याचे चित्र आहे निवडणूक जाहीर होताच प्रशासकीय कामकाजाला सुरुवात झाली आहे काल १० नोव्हेंबर पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली पहिल्या दिवशी एकही अर्ज आला नाही मात्र मागील सात दिवसांमध्ये मेहकर नगरपालिकेच्या सदस्य व अध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांनी आपल्याकडील थकीत असलेला कर भरण्यास सुरुवात केली ३०० पेक्षा जास्त लोकांनी दहा नोव्हेंबर पर्यंत २० लाख रुपये पेक्षा जास्त कराचा भरणा केला तर कित्येकानी आपल्याकडे नगरपालिकेचा किती कर बाकी आहे याची विचारणा केली येत्या तीन-चार दिवसांमध्ये ४०० च्या जवळपास इच्छुकांची वर्णी लागणार आहे मेहकर नगरपालिका निवडणुकीसाठी १३ प्रभाग असून यामध्ये २६ सदस्य आहेत तर एक नगराध्यक्ष अशा २७ जागांसाठी ही निवडणूक लढवली जाणार आहे मात्र जातीय समीकरणात मताचे विभाजन होणार आहे
तिकीट कोणाला खलबते सुरूच
मेहकर नगरपालिका निवडणुकीमध्ये सध्या बाळासाहेब ठाकरे गटाच्या इच्छुकांमध्ये एक तर काँग्रेसमध्ये दोन आणि शिंदे सेनेमध्ये चार नावे समोर आली आहेत भारतीय जनता पार्टी एक याशिवाय इतर अनेक इच्छुक असून ज्या ठिकाणी इच्छुकांची संख्या कमी आहे किंवा जवळजवळ नावे घोषित झाले आहेत अशांनी भेटीगाठी व प्रचाराला सुरुवात केली आहे तर इतर ठिकाणी उमेदवार तिकीट कोणाला यावर खलबते सुरू आहे

Post a Comment
0 Comments