बुलढाण्याच्या मेहकर मध्ये चिमुकलीचा मृतदेह उकरून कुत्र्यांनी तोडले लचके
मृत्यूनंतरही मरणयातना
(मेहकर :गजानन राऊत)
मेहकर मध्ये चिमुकलीचा मृतदेह उकरून कुत्र्यांनी तोडले लचके
तापेने आजारी असलेल्या दीड वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर एका कुटुंबांनी एक मोकळ्या जागेत
लहान खड्डा खोदून अंत्यविधी केला कमी खोलीचा खड्डा असल्याने, मोकाट कुत्र्यांनी मृतदेह उकरून त्याचे लचके तोडले मृतदेह पूर्णपणे छिन्नविछिन्न झाला ७ नोव्हेंबरला सकाळी सात वाजता मेहकर शहरात ही खळबळ जनक घटना उघडकीस आली विद्रुप झालेला मृदेह आढळून आल्याने सुरुवातीला अज्ञात आरोपींनी बालकाच्या हत्या केल्याची अफवा पसरली होती मात्र तपास अंति घडलेली दुर्घटना समोर आली मेहकर येथे ७ नोव्हेंबरच्या
सकाळी सात वाजता पीर मोहंमद उर्दू शाळेच्या मागे नगरपालिकेच्या स्वच्छालयजवळ लहान बालकांच्या मूर्त देहाचे अवशेष सापडले ही विपरीत घटना घडल्याची अंदाज बांधून परिसरात गर्दी जमली याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली मेहकर पोलिसांनी डॉग स्कॅाट व, फॉरेन्सिक टीम बनवून पाहणी केली यावेळी अवशेष सापडलेल्या परिसरातील एका खुल्या जागेत गाडलेल्या ठिकाणीही मृतदेहाचे अवशेष सापडले दरम्यान पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हा मृतदेह जानेफळ रोडवर झोपडीत राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील लहान मुलीचा असल्याचे समजले
भटकंती करणारे हे कुटुंब
कसेबसे जीवन जगत असून या भागात जीवन व्यतीत करीत होते दीड वर्ष मुलगी आजारी होती तिच्यावर उपचार करण्यात आले ६ नोव्हेंबरच्या रात्री तापेने तिचा मृत्यू झाला आई-वडिलांनी मानभाव पंथीय मंदिराच्या राखीव खुल्या जागेत खड्डा खोदला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार केला परंतु खड्डा जास्त खोल नसल्याने दुसऱ्या दिवशी मोकाट कुत्र्यांनी मृतदेह उकरला आणि लचके तोडले या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे हे कुटुंब भटकंती झोपडीत राहणारं गरीब कुटुंब आसल्याची माहीती आहे


Post a Comment
0 Comments