प्रलंबीत पिकविम्यावर पांडुरंग पाटील व कृषीमंत्र्यांत बैठक नाफेड खरेदी केंद्र वाढवन्याचीही केली मागनी
बुलढाणा:गजानन राऊत
बुलढाणा
संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील व महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दत्तामामा भरने यांच्यामद्ये बुलढाणा जिल्ह्यातील २०२३ मधील खरीप व रब्बीचे प्रलंबीत पिकविमे याबाबत बैठक पार पडली.मागील वर्षी धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील २०२३ खरीप व रब्बी पिकविम्यांच्या सर्व रिजेक्ट तक्रारी एक्सेप्ट करुन सर्वांना पिकविमे वितरीत करन्याचे एका प्रत्रकार परिषदेद्वारे जाहीर केले होते.तसे आदेशाचे पत्र सुद्धा त्यांनी दिनांक ७ ऑगष्ट २०२४ रोजी काढले होते.तसे आदेश असतानाही आजपर्यंत रिजेक्ट ठेवलेल्या शेतकर्यांची आकडेवारी व रितसर मागनीचे निवेदन सादर करत पाटील यांनी प्रभावी मांडनी केली.यावर उत्तरादाखल कृषीमंत्र्यांनी सदर विभागाचे संचालक यांना तत्काळ फोन करुन योग्य ती कारवाई करन्याचे आदेश दिलेत.तसेच पाटील यांनी ते आदेशाचे पत्र पुराव्यादाखल सादर केले.कृषीमंत्र्यांनीही पाटील यांनी मांडलेल्या सर्व विषयांची गांभीर्याने दखल घेत संबंधित संचालकांना सर्व विषय व्यवस्थित समजावुन घेन्याचे सांगीतले.यावेळी पांडुरंग पाटील यांनी कमी करन्यात आलेले नाफेड केंद्रांची संख्या तात्काळ वाढवुन याअगोदर सोयाबीन विकलेल्या शेतकर्यांना भावांतर योजना लागू करण्यात यावी अशी मागनी केली.सदर मुद्दा उपस्थित करताना पाटील यांनी सांगितले की शासनाने ५३२८/- रुपए प्रति क्विंटल हमीभाव निश्चित केलेले असतानाही नुकत्याच झालेल्या दिवाळी सनासाठी २८०० ते ४००० अशा मातीमोल भावात शेतकर्यांना सोयाबीन विकावी लागली.त्यामुळे सदर शेतकर्यांसाठी मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर भावांतर योजना लागू करुन भावफरकाची रक्कम शेतकर्यांना देन्याची मागनी लावुन धरन्यात आली.सदर मागन्यांवर कृषीमंत्री दत्तामामा भरने यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित संबंधित विभागांचे संचालक किंवा प्रमुख यांच्याशी बोलनं करवुन कार्रवाईचे आदेश दिलेत यावर पांडुरंग पाटील यांनी कृषीमंत्र्यांच्या तत्परतेविषयी समाधान व्यक्त केले.यावेळी संभाजी ब्रिगेड तालुका कार्यकारिणी सदस्य गजानन पवार,माजी सरपंच दिपक शिंदे, सदस्य गजानन लोंढे आदी संभाजी ब्रिगेड पदाधिकारी व इतर नेते उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments