Type Here to Get Search Results !

निर्भीड लेखणीला मानाचा मुजरा! दैनिक बातमी जगत चे मुख्य संपादक कैलास राऊत ‘लोकजागर वृत्तदर्पण २०२५’ पुरस्काराने सन्मानित...

 निर्भीड लेखणीला मानाचा मुजरा!


दैनिक बातमी जगत चे मुख्य संपादक कैलास राऊत ‘लोकजागर वृत्तदर्पण २०२५’ पुरस्काराने सन्मानित.....


मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज



हिवरा आश्रम येथे आयोजित एका भव्य आणि संस्मरणीय सोहळ्यात दैनिक बातमीजगत चे संपादक कैलास राऊत यांना ‘लोकजागर लोककला सांस्कृतिक मंच’ तर्फे देण्यात येणारा लोकजागर वृत्तदर्पण पत्रकारिता पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. सत्यनिष्ठ, निर्भीड आणि जनआवाजाला प्राधान्य देणाऱ्या त्यांच्या लेखणीचा हा सन्मानीय गौरव मानला जात आहे.

विवेकानंद आश्रम येथे झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी भूषवले. प्रमुख अतिथींमध्ये ह.भ.प. गजानन महाराज शास्त्री (विश्वधर्म योद्धा फाउंडेशन), सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कडेवार, आश्रम उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते, माजी प्राचार्य पंढरीनाथ शेळके, तसेच डॉ. सार्थक खरात यांची उपस्थिती लाभली.



मान्यवरांच्या हस्ते राऊत यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि मानाचा फेटा बांधून गौरविण्यात आले. गेली पंधरा वर्षे सातत्याने जनतेच्या प्रश्नांना अधोरेखित करताना निष्पक्ष पत्रकारितेचा आदर्श त्यांनी कायम ठेवला आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना राऊत म्हणाले,

ही लेखणी केवळ बातम्या लिहीत नाही, तर जनतेची तळमळ मांडते. हा सन्मान मी माझ्या वाचक देवतेला समर्पित करतो. या गौरवाने पत्रकारितेची जबाबदारी अधिक वाढली आहे.कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन लोकजागर लोककला सांस्कृतिक मंच चे अध्यक्ष शाहीर ईश्वर दादा मगर यांनी केले. उपस्थित मान्यवर व पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या पुरस्काराने सचोटीच्या पत्रकारितेला योग्य सन्मान मिळाल्याची प्रतिक्रिया मेहकर परिसरातून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments