मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सन २०१५ ते आजपर्यंत नोंदविण्यात आलेल्या
मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज
पोलीस प्रशासन अधिकारी व अन्न औषध सुरक्षा प्रशासन अधिकारी अवैध वाहतूक व विक्री संबंधित एकूण पंधरा गुन्ह्यांमधील जप्त गुटख्याचा नाश न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न औषध, सुरक्षा प्रशासन अधिकारी वनवे यांच्या उपस्थितीत जानेफळ पोलीस स्टेशन मधील ऐ. एस .आय .नागेश महाजन, उखंडाराव नेमाडे होमगार्ड अधिकारी अन्न औषध, प्रशासन कर्मचारी कटारे यांनी पंचा सक्षम जानेफळ ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांच्या संमतीनुसार व
ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या
मार्गदर्शनाखाली अन्न व औषध सुरक्षा प्रशासनाचे अधिकारी वसावे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कारवाई पार पडली. यावेळी जानेफळ पोलीस स्टेशनचे एएसआय नागेश महाजन, होमगार्ड अधिकारी उकंडराव नेमाडे, तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे कर्मचारी कटारे उपस्थित होते.
सदर जप्त मालाची पंचा समक्ष तपासणी करण्यात आली. जानेफळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गायकवाड साहेब यांच्या संमतीनुसार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील डम्पिंग ग्राउंडमध्ये गुटख्याचा अग्नी प्रज्वलित करून नाश करण्यात आला.
अवैध गुटखा विक्री व वाहतूक रोखण्यासाठी पोलीस प्रशासन व अन्न औषध सुरक्षा प्रशासनाकडून पुढील काळातही अशी संयुक्त कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Post a Comment
0 Comments