जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यकाचा शाळेतच मद्यधुंद अवस्थेत राडा
प्रार्थना सुरू असतानाच विद्यार्थ्यांसमोर आला आहे शिक्षक दारू पिऊन शाळेत
मेहकर : गजानन राऊत
दि: २१नोव्हेंबर धक्कादायक प्रकार शिक्षकांचा मेहकर तालुक्यात समोर आला
मेहकर तालुक्यातील मोहना बुद्रुक च्या जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
मुख्याध्यापक कांबळे यांच्यावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली.. शाळेचे मुख्याध्यापक धम्मसागर कांबळे हे दारूच्या नशेत शाळेच्या आवारातच धिंगाणा घालत असल्याचे पालकांच्या लक्षात आलेय .. ज्यावेळी मुख्याध्यापक कांबळे दारूच्या नशेत शाळेत दारू पिऊन आले आणि धिंगाणा घालायला लागले तेव्हा शाळेत सर्व विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते, आणि प्रार्थना सुद्धा सुरू होती.. या संदर्भातील काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.. तर ग्रामस्थानी या प्रकाराचा निषेध केला असून शिक्षण विभागाकडून तातडीने कारवाईची मागणी ग्रामस्थानी केलीय
या कारवाईकडे शिक्षण विभाग लक्ष घालेल का मेहकर तालुक्यात सर्वस्व चर्चा सुरू


Post a Comment
0 Comments