Type Here to Get Search Results !

मेहकर मध्ये ७ नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे ४५अर्ज मागे घेण्यात आले आहे

 मेहकर मध्ये ७  नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे ४५अर्ज मागे घेण्यात आले आहे


मेहकर :गजानन राऊत


मेहकर नगर अध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेल्या उमेदवारापैकी ७ जणांनी माघार घेतली नगरसेवपदांसाठी एकूण ४५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले कांसाठी अर्ज छाननीच्या प्रक्रियेनंतर एकूण १४ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात होते तसेच १३ प्रभागामधुन  २६ जागेसाठी नगरसेवक पदासाठी एकूण ३२६ उमेदवाराचे अर्ज होते 

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे दिवशी सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे नगराध्यक्षपदाचे ७ उमेदवार रिंगणात आहेत तर नगरसेवकांच्या निवडणुकीतून ४५ उमेदवार यांनी माघार घेतल्याने आता २८१ उमेदवार रिंगणात आहेत महाविकास आघाडी आणि महायुती न झाल्याने शिवसेना उबाठा चे किशोर गारोळे काँग्रेसचे कासम गवळी  शिवसेना शिंदे गटाचे अजय उमाळकर आणि भाजपचे सारंग माळेकर या प्रमुख उमेदवारासह बसपा एम आय एम आणि अपक्ष असे एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत भाजपाचे उमेदवार सारंग माळेकर यांनी सुद्धा प्रचारात आघाडी घेतल्यामुळे, सुरुवातीला शिवसेना उबाठा, काँग्रेस शिवसेना शिंदे गट यांच्यात वाटणारी तिरंगी लढत आता चौरंगी होण्याची चिन्हे आहेत

Post a Comment

0 Comments