शारंगधर बालाजी मंदिर,मेहकर
गुरूवार, २० नोव्हेंबर २०१५
मेहकर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शारंगधर बालाजी मंदिर येथे मा.ना.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या व माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची प्रचार फेरी आज शहराच्या विविध भागांत उत्साहात पार पडली.
या प्रचार दौऱ्यात थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले श्री.अजयभाऊ उमाळकर व प्रभाग क्रमांक ०१ मधून सौ.मनिषा भिमराव रामटेके,सौ.सुलोचना श्रीराम बेंडमाळी, प्रभाग क्रमांक ०२ मधून सौ.दिपीका रविराज रहाटे,श्री.परमानंद पिराजी गारोळे, प्रभाग क्रमांक ०३ सौ.लक्ष्मी गणेश भालेराव व हनिफ गवळी, प्रभाग क्रमांक ०४ मधून सौ.भावना विजय हिवाळे व कासम आमद गवळी, प्रभाग क्रमांक ०५ मधून गंगुबाई छट्टू गवळी व फातमाभी शेख मुनिर कुरेशी, प्रभाग क्रमांक ०६ मधून सौ.नर्मदा सुरेश गायकवाड व श्री.ओम प्रकाश पांडुरंग सौभागे, प्रभाग क्रमांक ०७ मधून आसरा वाघरा बी अब्दुल रफिक, रजेत सरफराज खान, प्रभाग क्रमांक ०८ मधून श्री.विशाल गणेश भिसे,सौ.सरला मोहन जाधव, प्रभाग क्रमांक ०९ मधून दिपाली किशोर गवई, श्री.धीरज सुनील गट्टानी, प्रभाग क्रमांक १० श्रीमती अक्काताई गायकवाड, सौ.कविता विशाल काबरा, प्रभाग क्रमांक ११ मधून सौ. कविता राजेश दांदडे, सौ.कांता राम कुसळकर, प्रभाग क्रमांक १२ श्री.सुरेश विश्वनाथ वाळूकर, सौ.प्रीती प्रवीण शिंगणात, प्रभाग क्रमांक १३ मधून सौ.रुपाली मनोज जाधव,श्री.भूषण भास्कर घोडे या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रमुख परिसरात भेटी दिल्या.
प्रचारदरम्यान नागरिकांनी उमेदवारांशी थेट संवाद साधला. स्थानिक पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक, सुरक्षा आणि परिसर विकास यांसारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि दिसून आलेला विश्वास यामुळे उमेदवारांचा उत्साह अधिक वाढला.
शिवसेना,युवासेना,महिला आघाडी व कार्यकर्ते,पदाधिकारी आणि स्थानिक समर्थक मोठ्या हजारोच्या संख्येने सहभागी झाल्याने संपूर्ण प्रचार फेरीला एकजुटीची आणि विकासनिष्ठ राजकारणाची झलक मिळाली.
आजची प्रचार फेरी केवळ औपचारिकता न राहता लोकांशी नाळ जुळवण्याचा, त्यांचा आवाज ऐकण्याचा आणि विकासासाठी खऱ्या अर्थाने बांधिलकी जपण्याचा दिवस ठरला.



Post a Comment
0 Comments