मेहकर लोणार महामार्गावर रोडच्या भेगा ठरल्या जीव घेणे दुचाकीचे टायर या भेगा मध्ये अडकल्याने मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने १६ वर्षीय मुलाला चिराडले
मेहकर :गजानन राऊत
मेहकर लोणार महामार्गावरील अतिशय दयनीय अवस्थेतील रस्त्याने आज पुन्हा एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला आहे भरधाव येणाऱ्या दुचाकीचे टायर रस्त्यावरील एका मोठ्या भेगेत अडकल्याने दुचाकी स्वार रस्त्यावर कोसळला आणि तितक्यात मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्याला चिरडले या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे मेहकर लोणार महामार्गावर चिंचोली बोरे फाट्या जवळ दुपारी दोन वाजेच्या सुमारास MH-१२ एजी २६२९ क्रमांकांच्या दुचाकीने राहील शेख व गणेश वानखेडे हे दोघे जात असताना महामार्गावरील रस्त्याच्या भेगा मध्ये मोटरसायकचा टायर गेल्यामुळे मोटरसायकल अनियंत्रित झाली व मागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने या मोटरसायकलला चिराडले यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी
हा अपघात २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान झालेला आहे यामध्ये
शेख राहील शेख असलम वय वर्ष १६ रहिवाशी मिलिंद नगर मेहकर याचा जागीच मृत्यु झाला, गणेश वानखेडे हा गंभीर जखमी झाला
मेहकर लोणार महामार्गावरील जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या भेगेत दोचाकीचे टायर अडकून मोटरसायकल रस्त्यावर, पडल्याने मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने या मोटरसायकलला चिरडले यामध्ये राहील शेख याचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र गणेश वानखेडे हा गंभीर जखमी झाला आहे जखमेला तातडीने उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे या रस्त्याच्या दुर्दशेमुळे गेल्या, अनेक दिवसापासून अपघाताची मालिका सुरू आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत त चालला आहे रस्त्याची दुर्वास्था कारणीभूत स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मेहेकर लोणार महामार्गाची अवस्था अत्यंत बीकट झाली आहे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून ते अपघातांना आमंत्रण देत आहेत एका निष्पाप तरुणाचा मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या जीवघेणे रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरली आहे प्रशासनाने या गंभीर घटनेची दखल घेऊन तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी जेणेकरून भविष्यात असे अपघात होऊन आणखी कोणाला आपला जीव गमवावा लागणार नाही


Post a Comment
0 Comments