Type Here to Get Search Results !

मंदिरातील दानपेटी चोरीचा ४८ तासांत उलगडा; एक आरोपी पोलीस जाळ्यात

 मंदिरातील दानपेटी चोरीचा ४८ तासांत उलगडा; एक आरोपी पोलीसांच्या जाळ्यात


      दि.२५ नोव्हेंबर 

    (गजानन राऊत मेहकर)



जानेफळ : दि.२३ नोव्हेंबर च्या रात्री मोहना खुर्द शिवारातील गट क्रमांक ९३ येथील श्री संत गजानन महाराज मंदिरातील दानपेटी फोडून झालेल्या चोरीचा उलगडा जानेफळ पोलिसांनी केवळ ४८ तासांत करत एकाला अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील १० ते १५ हजार रुपये इतकी रक्कम चोरीस गेल्याची तक्रार मंदिर संस्थेचे अध्यक्ष सुरेश रमेश जवंजाळ यांनी जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती.

तक्रारीनंतर पोलीस स्टेशन जानेफळ व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला. त्यातून विठ्ठल रमेश बंगाळे (वय २३, रा. किनी गोडमोड, ता. मालेगाव, जि. वाशिम) हा आरोपी निष्पन्न झाला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली (Hyundai Accent ) कार एम.एच.०४ जी.एम. ३८९० तसेच चोरीतील २३०० रुपये रोख रक्कम जप्त केली.

सदर प्रकरणातील दुसरा आरोपी शुभम गौतम शिखरे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, नायगाव दत्तपूर येथील स्टेट बँकेत झालेल्या चोरीच्या प्रयत्नासंबंधीही पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे (IPS), अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे व पोलीस निरीक्षक अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सपोनी अजिनाथ मोरे, पोउनि प्रताप बाजड, पोउनि संतोष जाधव, पोहेकॉ अमोल शेजोल, शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, राजेंद्र अंभोरे, रमेश नायडू, मोहन सावंत तसेच पोलीस कॉन्स्टेबल विशाल धोंडगे यांनी सहभाग घेतल.

Post a Comment

0 Comments