Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वस्तीगृहात संविधान दिन उत्साहात साजरा

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वस्तीगृहात संविधान दिन उत्साहात साजरा


मेहकर (प्रतिनिधी : गजानन राऊत)



मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वस्तीगृहात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वस्तीगृहाचे प्र. ग्रहपाल आर. सी. मखरीचे यांच्या मार्गदर्शनाखाली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


यानंतर संविधान दिनानिमित्त खंडाळा गावातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जय गोशांनी

देशाची शान भारत संविधान”, “वंदे मातरम” अशा जयघोषांनी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी तयार केलेली संविधान विषयक पोस्टर्स आणि फलक रॅलीचे विशेष आकर्षण ठरले. ही पोस्टर्स उमेश शिरभैय्ये आणि चंद्रकांत अंभोरे यांनी तयार केली होती.


रॅलीमध्ये वस्तीगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामध्ये उमेश शिरभैय्ये, जय शिरभैय्ये, प्रतीक शिंगणे, चंद्रकांत अंभोरे, सोमराज चरवे, शुभम इंगळे, लक्ष्मण हातागळे, सुदर्शन गायकवाड, कार्तिक वाघमारे, कुणाल गायकवाड, रोशन इंगळे, आशिष इंगळे, अविनाश बेटके, कृष्णा दालु, रोहित गवई, यश साठे, निर्भय सभादिंडे, सुरज पांडगळे, हरीओम पदमने, सुरज करे आदी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

कार्यक्रमावेळी वस्तीगृहातील संपूर्ण कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments