अंगणवाडीत स्मशानभूमी कि स्मशानभूमीत अंगणवाडीसं ग्रामपूर तालुक्यातील पिंप्री अडगांव गावात धक्कादायक प्रकार
मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज
बुलढाणा :गजानन राऊत
दि. ०४/११/२०२५
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पिंप्री अडगांव गावात अंगणवाडी इमारतीच्या शेजारीच स्मशानभूमी बांधण्यात आल्याने भीतीमुळे मुलांनी अंगणवाडीत जाणं बंद केला असून ही अंगणवाडी सध्या बंद आहे
स्मशानभूमीत अंगणवाडी अंगणवाडीत मशानभूमी मुलांनाही अंगणवाडीत जाणं बंद केलं आता तरी प्रशासनाला जाग येईल का असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला
अंगणवाडी शेजारी स्मशानभूमी हे ऐकून नवल वाटलं असेल
मात्र हा प्रकार आहे बुलढाणा जिल्ह्यातील प्रशासनाचा कारभाराचा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पिंप्री अडगांव या गावाच्या अंगणवाडी इमारतीच्या लगतच नवीन स्मशानभूमी बांधण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आलाय गावात मृत्यू झाल्यास याच मीठ संस्कार करण्यात येतात आणि आता मित्र या अंगणवाडीत आता मुलेच येत नाहीत त्यामुळे अंगणवाडीत मशानभूमी की स्मशानभूमीत अंगणवाडी असा अहवाल गावातील नागरिकांना पडला आहे या इमारतीत चक्क एका खाजगी व्यक्तीने बस्तान बसवलं असून आता तरी प्रशासन याकडे लक्ष देईल का असा प्रश्न गावकरी करीत आहे
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामधील पिंप्री अडगांव गावात जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गावातील अंगणवाडीच्या इमारतीला लागूनच प्रशासनाने स्मशानभूमी बांधली आहे. 'स्मशानभूमीत अंगणवाडी आहे की अंगणवाडीत स्मशानभूमी?', असा संतप्त सवाल आता गावकरी विचारत आहेत. या प्रकारामुळे लहान मुले भीतीने अंगणवाडीत येण्यास घाबरत असून, ही अंगणवाडी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मुलांअभावी या इमारतीचा वापर आता गुरांना बांधण्यासाठी होत असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आदिवासीबहुल भागातील या गावातील मुलांच्या शिक्षणाचा आणि पोषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासन याकडे कधी लक्ष देणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
याकडे प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे आहे


Post a Comment
0 Comments