मेहकर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज अर्ज पडताळणीसाठी १४ टेबल
मेहकर :गजानन राऊत
मेहकर
नगरपालिका निवडणुकीची आजपासून अर्ज स्वीकारणे सुरू होणार असून त्याला पाहता नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जयत तयारी सुरू केली आहे नगरपालिका निवडणुकीला पाहता नोव्हेंबर रोजी रविवार असून सुद्धा निवडणुकांच्या अनुषंगाने लागणारे सर्व विभाग सुरू होते तर सोमवारपासून प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाला सुरुवात होणार आहे मेहकर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी ३६ हजार ९३८ मतदार संख्या आहे तर तेरा वार्ड संख्या असून २६ नगरपालिका सदस्य व एक नगराध्यक्ष पदासाठी आजपासून अर्ज, भरायला सुरुवात होणार आहे अर्ज स्वीकारण्यासाठी १३ वार्ड साठी १३टेबल लावल्या जाणार आहेत तर नगरपालिका अध्यक्षपदासाठी एक टेबल राहणार आहे अशा १४ टेबल वरून अर्ज देणे अर्ज स्वीकारणे अर्ज पडताळणी करणे अशी कामे होणार आहेत निवडणूक निर्णय अधिकारी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मेहकर यांनी आठ नोव्हेंबर रोजी सर्व पक्षाचे उमेदवारी सर्व संघटना व इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली व निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना माहिती दिली सोबतच आचारसंहिताच्या बद्दल माहिती दिली या सोबतच दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली निवडणुकीच्या अनुषंगाने लागणारी कागदपत्रे ज्यात कर भरणा करून घेणे विविध दाखले त्याला पाहता संबंधित विभाग ९नोव्हेंबर रोजी खुले होती व त्या ठिकाणी गर्दी सुद्धा दिसून आली नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार व उमेदवार यांना लागणारी माहिती सोबतच मार्गदर्शन यासाठी मेकर निवडणूक विभागाने हेल्पलाइन सुरू केलेली असून या हेल्पलाइन मधून १४तास माहिती देण्यात येणार आहे

Post a Comment
0 Comments