रूपालीच्या माहेरच्यांनी घातला पोलीस ठाण्याला घेराव सासरच्या लोकांना अटक करा तीन तास तणावाचे वातावरण
मेहकर तालुक्यात झोपेत पत्नी व मुलाचा खून करणाऱ्या आरोपी राहुल मस्के याला पोलिसांनी अटक केली मात्र सासरच्या लोकांचा देखील मृत रूपालीला त्रास होता या गुन्ह्यात त्यांचाही सहभाग असल्याने सासू सासरा व दिरास अटक करावी या मागणीसाठी ३१ डिसेंबरला दुपारी रूपालीच्या माहेरच्या संतप्त लोकांनी, मेहकर पोलीस ठाण्याला घेराव घातला
तीन तास ठिय्या मांडण्यात आला जमाव आक्रमक झाल्याने तणाव निर्माण झाला होता ठाणेदारांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी माघार घेतली मेहकर शहरात २९ डिसेंबरच्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास आरोपी राहुल मस्के यांनी पत्नी रूपाली व मुलगा रियांश यांच्यावर झोपेत असतानाच कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली चारित्र्यावर संशय घेत आरोपीने हे कृत्ये केले या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राहुल मस्के याला अटक केली परंतु आमच्या मुलीला सासऱ्याच्या लोकांकडून ही त्रास होता तिचा वारंवार छळ करण्यात आला असा आरोप, रूपालीच्या माहेरच्या लोकांनी केला तिच्या हत्येस पती राहुल हाच जबाबदार नाही तर दिर सासू व सासरे हे देखील दोषी आहेत असे सांगत मोळा येथील माहेरच्या लोकांनी बुधवारी दुपारी मेहकर पोलीस स्टेशन गाठून घेराव घातला जोपर्यंत आरोपींना अटक होत नाहीत तोवर आम्ही इथून हलणार नाही असा पवित्रा संतप्त नातेवाईकांनी घेतला दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी दंगा काबू पथक बोलवण्यात आले या प्रकरणी चौकशी सुरू असून जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक केली जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आले त्यामुळे रूपालीच्या माहेरच्या नातेवाईकांनी माघार घेतली रूपाली व रियांशचा खून प्रकरणात आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे तपास सुरू असून आणखी आरोपी निष्पन्न झाले तर कारवाई करण्यात येईल असे माहेरकडील मंडळींना सांगण्यात आल्याचे ठाणेदार व्यंकटेशर आलेवार यांनी सांगितले
पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहे

Post a Comment
0 Comments