Type Here to Get Search Results !

बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आंदोलन एकाच व्यक्तीने घेतलेल्या दुबार विहीर लाभाची चौकशी करण्याची मागणी

 बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आंदोलन

एकाच व्यक्तीने घेतलेल्या दुबार विहीर लाभाची चौकशी करण्याची मागणी



मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज



एकीकडे नवीन वर्षाचे जोरदार स्वागत तर दुसरीकडे आंदोलन

बुलढाणा जिल्ह्यात नवीन वर्षाचे स्वागत सुरू असतानाच चिखली पंचायत समितीसमोर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. एकाच व्यक्तीने शासनाच्या योजनेअंतर्गत दोन वेळा विहिरीचा लाभ घेतल्याचा गंभीर आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, प्रल्हाद कचरू शेजोळ, रा. सारशिव, ता. मेहकर, जि. बुलढाणा यांनी विशेष घटक योजनेअंतर्गत सन २००२-२००३ मध्ये मेहकर पंचायत समिती अंतर्गत विहिरीचा लाभ घेतला होता. मात्र त्यानंतर शासनाची दिशाभूल करून बनावट कागदपत्रांच्या आधारे आणि खोटी माहिती सादर करत सन २०१८–२०१९ मध्ये चिखली पंचायत समिती अंतर्गत सावरखेड बु. शिवार, ता. चिखली येथे पुन्हा विहिरीचा दुबार लाभ घेतल्याचा आरोप आहे.

या दुबार लाभामुळे खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीची तात्काळ चौकशी करून शासनाचा लाभ वसूल करण्यात यावा, अन्यथा संबंधित ७/१२ उताऱ्यावर बोजा चढवण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे.

या आंदोलनात पंकज वाघ, मनीष जाधव आणि प्रविण राजगुरू (रा. सारशिव, ता. मेहकर) हे सहभागी आहेत.





 बुलढाणा जिल्ह्यात नवीन वर्षाचं स्वागत सुरू असतानाच चिखली पंचायत समितीसमोर शेतकऱ्यांचं आंदोलन पाहायला मिळत आहे.


 एकाच व्यक्तीने शासनाच्या योजनेतून दोन वेळा विहिरीचा लाभ घेतल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. प्रल्हाद कचरू शेजोळ, रा. सारशिव, ता.

 मेहकर यांनी २००२–०३मध्ये मेहकर पंचायत समिती अंतर्गत लाभ घेतल्यानंतर २०१८–१९ मध्ये चिखली पंचायत समिती अंतर्गत पुन्हा विहिरीचा लाभ घेतल्याचा आरोप आहे.

 आंदोलकांची भूमिका


 जोपर्यंत संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील



 या दुबार लाभामुळे गरजू शेतकरी योजनांपासून वंचित राहत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी कडक* *कारवाईची मागणी केली आहे

 चिखली पंचायत समितीसमोर आंदोलन


👉 *एकाच व्यक्तीने विहिरीचा दुबार लाभ घेतल्याचा आरोप* 

👉 *बनावट कागदपत्रांद्वारे शासनाची दिशाभूल* 

👉 *दोषींवर कारवाई व लाभ वसुलीची मागणी* 

👉 *कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार*

Post a Comment

0 Comments