Type Here to Get Search Results !

श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र, दिंडोरी प्रणित, रामनगर मेहकर येथे दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा

 श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र, दिंडोरी प्रणित, रामनगर मेहकर येथे दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा


 (प्रतिनिधी – गजानन राऊत)





बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणित रामनगर केंद्रामध्ये दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक उपक्रमांना आज मंगलमुहूर्ताने सुरुवात झाली. श्री स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा असलेल्या हजारो भाविकांनी सकाळपासूनच केंद्र परिसरात मोठी गर्दी केली होती.


दि. २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या काळात अखंड यज्ञ-याग, गुरुचरित्र पारायण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहासाठी उपस्थित सर्व भाविक, सज्जन व सेवेकऱ्यांचे प्रेमपूर्वक स्वागत करण्यात आले.


दत्त जयंती उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे भाविकांची गर्दी या वर्षीदेखील सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत हे शिबिर रामनगर केंद्रात पार पडणार आहे.


सकाळपासूनच भाविकांच्या उपस्थितीमुळे परिसरात भक्तीमय वातावरण, उत्साह आणि धार्मिक उर्जा ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Post a Comment

0 Comments