केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला काल रात्री समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नजीक भीषण अपघाता
मेहकर बुलढाणा
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला काल रात्री समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव नजीक भीषण अपघाता.
या कार मध्ये प्रवास करत असलेले मंत्री प्रतापराव जाधव यांचे अंगरक्षक, त्यांचे सहकारी व कारचालक असे तिघे गंभीर जखमी झाले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना नागपूर विमानतळावर पोहोचविल्यानंतर हे तिघे मेहकर कडे परत येत असताना रात्री उशिरा हा अपघात झाला. गंभीर जखमींना वाशीम येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे
व त्यांच्यावर उपचार सुरू आहे. रात्री उशिरा अपघात घडल्याने याबद्दलची माहिती मंत्री प्रतापराव जाधव यांना आज दुपारी देण्यात आली.
प्रतापराव जाधव यांना अपघाटाची माहिती मिळताच ते नागपूर वरून मुंबईला पोहोचले होते ते पुढे दिल्ली ला जाणार होते .. मात्र अपघाताची माहिती मिळाल्याने त्यांनी दिल्ली जाणे रद्द केले व ते मुबाई वरून मेहेकरला परत आले…
तिघेजण गंभीर आहेत जखमीवर वाशीम येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे..
हा अपघात माळेगाव जवळ झाला, मुंबईवरून एक मिनी ट्रक नागपूर कडे जात होता मात्र त्याने अचानक यु टर्न घेतला त्यात मंत्र्याची कार ही नागपूर वरून मेहेकर कडे येत होती समोरच्याने यु टर्न घेयाने कार त्या ट्रक ला धडकली व त्यात कर चाकणांचूर झाली असून सुदैवाने अफ्याप पर्यंत जीवितहानी नाही ..




Post a Comment
0 Comments