Type Here to Get Search Results !

मेहकर पंचायत समितीसमोर अन्नत्याग आंदोलन

 मेहकर पंचायत समितीसमोर अन्नत्याग आंदोलन




मेहकर | प्रतिनिधी – गजानन राऊत


मा. आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर येथे घेतलेल्या जनता दरबारात पंचायत समिती मेहकर अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांबाबत तक्रारी मांडण्यात आल्या होत्या. मात्र सारशिव येथील जलहिताच्या व इतर मागण्या अद्याप पूर्ण न झाल्यामुळे आज दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालय, मेहकर समोर अन्नत्याग आंदोलनास सुरुवात करण्यात आली.



या आंदोलनात सहभागी आंदोलनकर्त्यांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत—


सारशिव येथील हिंदू स्मशानभूमीसाठी राखीव असलेली ६० आर जमीन खुली करून ती हिंदू समाजाच्या ताब्यात देण्यात यावी.


हिंदू समाजासाठी राखीव असलेल्या ६० आर जमिनीवर बेकायदेशीररीत्या बसवलेली झटका मशीन तत्काळ काढण्यात यावी.


जिल्हा परिषद शाळेभोवती केलेले अवैध अतिक्रमण तत्काळ हटवून शाळेचा परिसर मोकळा करण्यात यावा.


सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या सरकारी विहिरीवरून बेकायदेशीर शेती सिंचनासाठी होणारा पाणी उपसा थांबवण्यात यावा.


संबंधित विद्युत पंप जप्त करण्यात यावेत.


या आंदोलनाचे नेतृत्व पँथर प्रविण राजगुरू यांनी केले. आंदोलनात पत्रकार मनीष जाधव तसेच पँथर पंकज वाघ यांची उपस्थिती होती. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments