Type Here to Get Search Results !

मेहकरात मातंग समाजाच्या वतीने कॅण्डल मार्च लातूर येथील नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला

 


मेहकरात मातंग समाजाच्या वतीने कॅण्डल मार्च लातूर येथील नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा   संशयास्पद मृत्यू झाला




कु. अनुष्का पाटोळे हत्या प्रकरणी मेहकर शहरात सकल  मातंग समाज बांधवांचा शेकडो महिला पुरुषाच्या उपस्थित कॅण्डल मार्च काढून निषेध व कारवाईची मागणी केली


या घटनेच्या निषेधार्थ मेकर शहरात १७ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी शांततेत कॅण्डल मार्च काढण्यात आला यावेळी लातूर येथील नवोदय विद्यालयाच्या घटनेतील दोषीवर कारवाई करून लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सह आरोपी करा अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने यावेळी करण्यात आली मेहकर तालुका व शहरातील मातंग बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी पार्क येथील अण्णाभाऊ साठे पुतळा येथून कॅन्डल मार्चला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पोलिसांच्या बंदोबस्तात कॅण्डल मार्च छत्रपती शिवाजी पार्क इथून आरंभ होऊन आंबेडकर वाटिका बालाजी रोड मुख्य मार्केट मार्गे मोदाणी कॉम्प्लेक्स समोरून मार्गकम करत सोनार गल्ली बडाराम मंदिर लोणार वेस मारुती मंदिर समोरून चिंच परिसरातून पुढे जात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ कॅण्डल मार्च चे श्रद्धांजली सभेत रूपांतर झाले यावेळी मनोगत व्यक्त करताना अष्टपैलू असलेल्या या चिमुकलीचा लातूर येथील नवोदय विद्यालय येथे संशयास्पद मृत्यू झाला याला जबाबदार असणाऱ्या वर कठोर शासन व्हावे तसेच लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना सह आरोपी करण्यात यावे अशी एकमुखी मागणी मान्यवरांनी केली यावेळी कैलास खंदारे .कैलास सुखदाने. यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक ज्ञानदेव मानवतकर संचालन बबनराव रत्नपारखी. तर निलेश मानवतकर .यांनी उपस्थितीचे आरंभ मानले सामूहिक श्रद्धांजली नंतर कॅन्डल मार्चचा समारोप करण्यात आला

 समाज बांधवांनी घडवले शिस्तीचे दर्शन 

१७ जानेवारी रोजी काढण्यात आलेला कॅण्डल मार्चमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती विविध जाती-धर्मातील समाज बांधवासह विविध सामाजिक संघटनेने कॅण्डल मार्चमध्ये सहभाग नोंदवला समाज मन हिलावून टाकणाऱ्या घटनेसाठी सामाजिक संवेदना जगवण्याकरिता शेकडो समाज बांधव एकवटले होते शेकडो कॅण्डलच्या प्रकाशाने अन्यायरूपी अंधार दूर होण्यासाठी हा कॅण्डल मार्च काढण्यात आला असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले


Post a Comment

0 Comments