Type Here to Get Search Results !

समृद्धीवरील अपघात व अवैध धंदे रोखण्यासाठी महसूल प्रशासनाची समृद्धी महामार्गावर पाहणी

 समृद्धीवरील अपघात व अवैध धंदे रोखण्यासाठी महसूल प्रशासनाची समृद्धी महामार्गावर पाहणी 

    खुश्किचे मार्ग अवैध दारू, गांजा, विनापरवाना हॉटेल्स, अवैध रेती वाहतूक स्पीड कॅमेरे यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी पाहणी करून समृद्धी प्रशासनाला सूचित केले


मेहक :गजानन राऊत





  हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा बुलढाणा जिल्ह्यातून ८७ किमी जातो ज्याला पाहता समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये होणारे अपघात व समृद्धीवर होणारी रेती चोरी, अवैध धंदे याला पाहता महसूल प्रशासनाने १३ जानेवारी रोजी बेलगाव ते पारडा या ८७ किमी चा दौरा करत समृद्धीवर काय काय सुधारणा व्हायला पाहिजे याचा आढावा घेत समृद्धी प्रशासनाला त्यासंबंधी सूचना दिल्या.



        समृद्धी महामार्ग हा ज्या जिल्ह्यातून जाईल त्या जिल्ह्यात समृद्धी घेऊन येईल असे वाटत असतानाच प्रत्यक्षात मात्र समृद्धी महामार्ग झाल्यापासून जिल्हा वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहिला ज्या त मध्ये समृद्धीवरून होणारी अवैध रेती वाहतूक, समृद्धीवर होणारी दारू विक्री गांजा विक्री अवैध हॉटेल्स अशा अनेक कारणांनी हा समृद्धी महामार्ग चर्चेत आहे त्यासोबतच समृद्धीचे इतिहासामधील सर्वात जास्त अपघात बुलढाणा जिल्ह्यात व समृद्धीच्या इतिहासातील सर्वात मोठी सोन्याची फ्लूटपाट सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातच झाली याला पाहता १३ जानेवारी रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर खांदे व जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार त्यासोबतच तहसीलदार निलेश मडके,स्थानिक ग्रामस्थरीय महसूल अधिकारी व कोतवाल यांनी बुलढाणा जिल्ह्यातील बेलगाव ते पारडा या ८७ किमी परिसरातील समृद्धी महामार्गाची पाहणी केली ज्यामध्ये खुश्किचे मार्ग जेथून अवैध रेती वाहतूक, अवैध प्रवासी वाहतूक, सोबतच गुटखा यासारख्या अवैध धंद्याला पूरक अशा वाहतुकी होतात त्या खुश्किच्या मार्गावर साईट पट्ट्या लावून मागच्या बाजूला जेसीबीने मोठा खड्डा करून साईड पट्ट्याचे नट बोल्ट खोलू नये यासाठी त्याला वेल्डिंग करावी तसेच ज्या ठिकाणी सिमेंट वॉल कंपाऊंड नाहीत अशा ठिकाणी लवकरात लवकर वॉल कंपाऊंड व जाळी बसवणे यासारखे कामे त्वरित करून घेण्याचे समृद्धी प्रशासनाला सुचित करण्यात आले.

  ( मेहकर तालुक्यामध्ये डोणगाव जवळ खूप अपघात झाले त्यात अनेकांना जीव गमावा लागला यासाठी कारणीभूत म्हणजे येथे समृद्धी महामार्गावर इमर्जन्सी लेंनवर उभी राहणारी वाहने ही वाहने या ठिकाणी असलेल्या सुविधाला पाहता उभी राहतात ज्या मध्ये दारू गांजा अवैध हॉटेल्स हे कारण असल्याचे दिसून येते त्याला पाहता अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर खांदे व तहसीलदार निलेश मडके यांनी डोणगाव येथे सिमेंट वॉल कंपाऊंड नसल्याने हॉटेल्स अवैध व्यवसाय, रेती वाहतूक सुरू आहे ज्याला पाहता अपघात सुद्धा होतात तर समृद्धीवर दारू व गांजा मिळत असल्याने ट्रक चालक नशा करतात यासाठी समृद्धी लगत वॉल कंपाऊंड लवकरात लवकर करावी त्यासाठी लागणारे पोलीस संरक्षण देण्यात येईल तसेच समृद्धीवर वेगावर आवर घालण्यासाठी स्पीड कॅमेरे बसवण्याच्या सूचना समृद्धी प्रशासनाला देण्यात आल्या )

Post a Comment

0 Comments