शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी मारहाण! तालुका कृषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
शेतकऱ्यांवर अन्याय की अधिकाऱ्यांचे संरक्षण– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर थेट सवाल
मेहकर :गजानन राऊत
मेहकर दि:१६/०१/२०२६
फळबागेच्या मस्टरचे प्रलंबित पैसे न मिळाल्याने गोगरी (ता. मंगरूळपीर) येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी काल जिल्हा कृषी कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आज तालुका कृषी अधिकारी श्री. कांबळे हे गोगरी गावात आले असता, आपली तक्रार मांडण्यासाठी गेलेल्या शेतकरी ऋषिकेश पवार यांना संबंधित अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा अत्यंत गंभीर व धक्कादायक प्रकार घडला आहे.शेतकऱ्यांनी
त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणे हा गुन्हा नसून, लोकशाही व्यवस्थेत तो मूलभूत अधिकार आहे. मात्र, शेतकऱ्यावर हात उचलून दडपशाही व मुजोरी दाखवणाऱ्या अधिकाऱ्याचे कृत्य हे संपूर्ण शेतकरी समाजाचा अपमान करणारे असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.या घटनेचा क्रांतिकारी शेतकरी संघटना, मेहकर तालुका तीव्र शब्दांत निषेध करीत असून, संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनासह कठोर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच, पीडित शेतकरी ऋषिकेश पवार यांना तात्काळ न्याय व संरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मेहकर तहसीलदारांमार्फत मा. मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून, जर तात्काळ कारवाई झाली नाही तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, गणेश प्रकाश गारोळे, कैलास किसन उतपुरे, प्रविण दादाराव उतपुरे सुरेश किसन खरात,भगवानराव लंबे.




Post a Comment
0 Comments