३५ तासानंतर बिबट्याचे पिल्लू आईच्या कुशीत वन विभागाचे मिशन वात्सल्य यशस्वी
(मेहकर गजानन राऊत)
कळमेश्वर शिवारातून ताटा तुट झालेल्या बिबट्याच्या पिल्याची आणि मातेची अखेर भेट झाली, ३५ तासानंतर माता पिल्यास नेण्यासाठी आली व विभागाने दोन दिवसापासून सुरू केलेले मिशन अखेर यशस्वी झाले घाटबोरी वन परिक्षेत्रातील कळमेश्वर शिवारात सुभाष खुरद यांच्या शेतातील गोठ्यात ३१ डिसेंबरच्या सकाळी आठ वाजता नर्मदी बिबटे आढळून आले होते राजेश खरात याला धडक मारून त्यांनी पलायण केले तोंडात धरून दोन पिल्ले सोबत नेण्यात आली मात्र एक पिल्लू तिथे सुटले वघडवण्यासाठ वनविभागाने ३१ डिसेंबरला आईपासून दुरावलेले पिल्लू भेट घडवण्यासाठी पिल्लू तिथेच शेतात ठेवले होते परंतु त्याची आई आली नसल्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी १ जानेवारीला सायंकाळी मिशन वास्तव्य राबविण्यात आले एका कॅरेटमध्ये पिल्लू ठेवण्यात आले होते आजूबाजूला मोशन सेन्सर असलेले कॅमेरे लावण्यात आले होते तसेच वन विभागाचे कर्मचारी सावधगिरी वाळवून सुरक्षित ठिकाणी थांबले होते, एक जानेवारी सायंकाळी ७ वाजून ३५मिनिटांनी बिबट्याच्या पिल्लाची माता कॅरेट जवळ आली आजूबाजूचे निरीक्षण केल्यानंतर कॅरेट खाली पाडले आणि पिल्यास घेऊन निघून गेली वनविभागाने थर्मल ड्रोनदरे पाहणी करत मिशन वात्सल्य पुर्णत्वास आल्याची खात्री केली यासाठी जिल्हा उपवनसंरक्षक सरोज गवस सहायक वनसक्षण अधिकारी वैभव काकडे आरआरयू टीम व घाटबोरी वनपरिक्षेत्रचे अधिकारी अंकुश येवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली सलग दोन दिवस कोणताही विसावा न घेता सर्च ऑपरेशन तसेच मिशन वात्सल्याची तयारी केली अखेर ३५ तासानंतर पिल्लू आईच्या कुशीत शिरले

Post a Comment
0 Comments