Type Here to Get Search Results !

जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही किशोर गारोळे यांनी स्वीकारला नगराध्यक्षाचा पदभार

 जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही किशोर गारोळे यांनी स्वीकारला नगराध्यक्षाचा पदभार

 यावेळी आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले नगरपालिकेच्या कामात ढवळाढवळ करणार नाही


(मेहकर :गजानन राऊत) 



मेहकर नगरीचे विकास कामे करताना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर कुठलाही दबाव राहणार नाही आमच्याकडून काही चुका झाल्यास जनतेने त्या लक्षात आणून द्याव्यात नगरपालिकेत कोणताही भेदभाव आमच्याकडून मुळीच होणार नाही तर नगरसेवकांकडून पक्षपात होईल असे मला वाटत नाही सर्वांना सोबत घेऊन गावातल्या विकास करणार असून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे आश्वासन नवनिर्वाचित नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी दिले

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे



मेहकर चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष किशोर गारुळे यांनी ५जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर आयोजित नगरी सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले होते की या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख नरेंद्र खेडेकर मंचावर आमदार सिद्धार्थ खरात माजी नगराध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक विलासराव सनखुरे जिल्हा उपप्रमुख आशिष राहते तालुकाप्रमुख लिंबाजी पांडव, संघटक श्याम निकम माजी नगरसेवक भास्करराव गारोळे सिनखेडराजा येथील न .प.सदस्य छगन मेहत्रे, डॉक्टर सांगळे शिवसेना युवा प्रमुख आकाश घोडे सह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर आदींनी मनोगत व्यक्त केले पदभार स्वीकारण्या अगोदर शक्ती ट्रॅक्टर शोरूम पासून रॅली काढण्यात आली नगरपालिकेच्या गेटमध्ये किशोर गारोळे यांनी डिफेंडर गाडीतून प्रवेश करताच, कार्यकर्त्याकडून घोषणा करत फटाक्याची जोरदार आतिषबाजी करण्यात आली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रवेश दारात औक्षण करत , पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर आमदार सिद्धार्थ खरात यांच्या मुख्य उपस्थितीत व उ.बा.ठा.शिवसेना पदाधिकारी तथा असंख्य कार्यकर्त्यांसमवेत पदभार स्वीकारला, यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्यासह उ.बा.ठा.शिवसेना गटनेते विलासराव सनखुरे नवनिर्वाचित नपा. सदस्य सतीश ताजने नितीन तुपे महेश रिंडे रूपाली किशोर गारुळे निस्तार अन्सारी,  यांचा तालुका व शहर उबाठा.शिवसेना गिरधर ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस ( अजितदादा गट) पदाधिकारी व कार्यकर्ते नगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच विविध संघटना तसेच शहरातील मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला शोभा खेडेकर पौर्णिमा गवई छोटू गवळी नगमाबी गवळी , सलमान पठाण शेख खुर्शीदबी इस्माईल शेख सलमान शेख चांद ,दिपाली सांगळे, लता जुनघरे, शहनावी शे अफसर, आली राजेक, अश्विनी खंडागळे. लिलाबाई आराख ,डॉ.मधुकरराव चांगाडे, महेश पवार, शितल सावजी ,अशोक तुपकर, लता आडेलकर, ममता वाघमारे, दिपाली जगताप ,आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विलास चनखोरे ,संचालन निसार अन्सारी ,तर आभार भास्कर गारोळे ,यांनी मानले

नगरपालिका कारभारात ढवळाढवळ करणार नाही आमदार खरात

नगराध्यक्ष किशोर गारोळे यांना जनतेने दिलेल्या पाठिंबामुळे मेहकरत इतिहास घडविला या निवडणुकीत किशोर गारोळे विजय होतील याचा मला आत्मविश्वास होता कारण गारुडे कुटुंबाकडे संघर्षाची धार आहे विचारांची परंपरा या मतदार संघाला आहे मेहकर शहर मतदार संघाचे केंद्रबिंदू आहे आम्ही जे बोलतो ते करून दाखवू आमदार असलो तरी नको कारभारात ढवळाढवळ करणार नाही गरज पडल्यास खंबीरपणे पाठीशी उभा राहील असे आमदार सिद्धार्थ खरात यांनी यावेळी सांगितले

Post a Comment

0 Comments