डोणगाव–आरेगांव रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व डांबरीकरण करा
अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार जिल्हाध्यक्ष डॉ टाले यांचा कार्यकारी अभियंता यांना इशारा
मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज
मेहकर दि. ०६/०१/२०२६
डोणगाव ते आरेगाव हा अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा रस्ता आज पूर्णतः खराब अवस्थेत असून, संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. सदर रस्त्यासाठी वारंवार निवेदन देण्यात आले. उपविभागीय बांधकाम करण्यात आंदोलन सुद्धा करण्यात आले. त्यानंतर त्यानंतर काही दिवसापूर्वी या रस्त्याचे बी.बी.एम चे काम सुरू करण्यात आले मात्र त्यानंतर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्ता अक्षरशः अपघातांना आमंत्रण देत आहे. तरीही प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी केला आहे.
डोणगाव–आरेगाव रस्त्यावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण, कामगार तसेच शेतमाल वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. खराब रस्त्यामुळे दुचाकी व चारचाकी अपघात वाढले असून वाहनांचे नुकसान, वेळेचा अपव्यय व जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून परिस्थिती आणखीनच गंभीर होते.या रस्त्यावर वाढलेल्या वर्दळीमुळे दिवसभर प्रचंड प्रमाणात धूळ उडत आहे. या धुळीमुळे लहान मुले, वृद्ध नागरिक, महिला तसेच रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना दम्याचा, श्वसनाचा व इतर गंभीर आजार जडत आहेत. अनेक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.धुळीमुळे केवळ नागरिकच नव्हे तर रस्त्यालगतचे दुकानदार, व्यावसायिक व व्यापारी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. धुळीमुळे दुकाने, मालसामान व ग्राहक यांना त्रास सहन करावा लागत असून, व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. अनेक व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून, प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसले असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.सदर रस्त्याबाबत वेळोवेळी निवेदने देऊनही आणि निधी व कामाची मंजुरी असतानाही प्रत्यक्षात काम सुरू न होणे, हे प्रशासनाच्या अपयशाचे व बेजबाबदारपणाचे स्पष्ट उदाहरण आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची संगनमताची भूमिका संशयास्पद असून, नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट खेळ केला जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.डोणगाव–आरेगाव रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन, रास्तारोको व घेराव करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू न केल्यास जनतेचा रोष तीव्र होत आहे.जनभावेचा विचार व्हावा अन्यथा आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही असा कडक इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. तर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा व पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना सुद्धा देण्यात आल्या. यावेळी विजय आंधळे,गणेश असाबे.

Post a Comment
0 Comments