अनोळखी व्यक्तीकडूनपत्रकारास फोनवरून शिवीगाळ व धमकी
पोलीस अधीक्षकांकडे निवेदन
मेहकर (प्रतिनिधी):
खंडाळा (ता. मेहकर) येथील पत्रकार गजानन कडुजी राऊत यांना अनोळखी व्यक्तीकडून फोनवरून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत त्यांनी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदन सादर करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ०८जानेवारी रोजी सकाळी ७.१६ वाजताच्या सुमारास गजानन राऊत यांच्या मोबाईलवर एका, अनोळखी क्रमांकावरून वारंवार फोन कॉल आले. कॉल करणाऱ्या व्यक्तीने मकर संक्रांतीचे बॅनर बनवण्याबाबत विचारणा केली. की भाऊचं बॅनर बनवायचं मात्र त्यांनी त्या व्यक्ती ला सांगितले मी बॅनर बनवण्याचे काम करत नाही असे सांगितल्यानंतर संबंधित व्यक्तीने उद्देशपूर्वक अश्लील शिवीगाळ केली आसे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गजानन राऊत यांनी जिल्हा पोलीस एसपी ऑफिस यांना पहिले ईमेलद्वारे तक्रार दाखल केली व सायबर पोलीस बुलढाणा यांना सुद्धा ई-मेल द्वारे तक्रार दाखल केल्याची देखील सांगण्यात येत आहे
काही दिवसांपूर्वी बॅनरच्या कारणावरून गावातील एका व्यक्तीसोबत वाद झाला असून त्या वेळीही धमकी मिळाल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यावेळी सदर त्या व्यक्तीने माफी मागितली होती त्यामुळे सदर फोन करणारी व्यक्ती किंवा त्यामागील काही ओळखीच्या व्यक्तींकडून छळ केला जात असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
काही काळ त्यांनी , आशा फोन कॉल ला इग्नोर केले गेल्याचे राऊत यांनी सांगितले परंतु वारंवार अशी कॉल येत असल्याने त्यांनी थेट बुलढाणा गाठुन एस पी कार्यालय बुलढाणा इथे तक्रार अर्ज दाखल केला
त्यांची मागणी आहे की
या प्रकरणी भारतीय दंड विधान संहिता कलम ५०४, ५०६ व ५०७ अन्वये गुन्हा दाखल करून संबंधित मोबाईल क्रमांकाची सखोल चौकशी करावी तसेच स्वतःच्या जीवितास संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.


Post a Comment
0 Comments