Type Here to Get Search Results !

खंडाळा ( देवी ) येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी भिम अनुयायांकडून कॅन्डल लावून अभिवादन

 खंडाळा ( देवी ) येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी

भिम अनुयायांकडून कॅन्डल लावून अभिवादन 




मेहकर बुलेटिन एक्सप्रेस न्युज


खंडाळा देवी 

मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथे माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी परिसरातील असंख्य भीम अनुयायी उपस्थित होते.



जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिसरात भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले तसेच कॅन्डल लावून अभिवादन करण्यात आले. माता रमाई यांच्या सामाजिक कार्याचा, त्यागाचा व संघर्षमय जीवनाचा उपस्थितांनी आदरपूर्वक स्मरण केले.


कार्यक्रम शांतता, शिस्त व एकतेच्या वातावरणात पार पडला. समाजात बंधुता व समानतेचा संदेश देण्यात आला.


या वेळी मनीषा पडघान,, भीमराव देबाजे, दिनेश अडागळे, मधुकर देबाजे, पत्रकार गजानन राऊत, अनुसया आडगळे, धनंजय राऊत, विक्की देबाजे,सिध्दार्थ देबाजे, राजु आवचार,राधिका राऊत, सुमन देबाजे, गीता खिल्लारे, गोदावरी झरे, वंदना पोघे,सावित्रीबाई मोरे,बेबाबाई राऊत, नंदाबाई पडघान, दिलीप अंभोरे, भारत खिल्लारे, विजय अडागळे,शंकर अडागळे,अनिल वाकोडे, शरद खिल्लारे, कैलास पाईक, सचिन मोरे, दशरथ साळवे, किसना वाकुडे,आशा,वाकुडे , गंगाबाई मनवर,किसन गव्हांदे, यांच्यासह अनेक भीम अनुयायी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments