श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आमदार सिद्धार्थ खरात यांची सदिच्छा भेट
पाण्याच्या प्रश्नावर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
अकोला ठाकरे / खामखेड (ता. मेहकर)
प्रतिनिधी : गजानन राऊत
खामखेड येथील गट ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती मेहकर, जिल्हा परिषद बुलढाणा येथे आज रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त मेहकर–लोणार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात यांनी सदिच्छा भेट दिली.
या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व स्मशानभूमीचा महत्त्वाचा मुद्दा आमदारांसमोर मांडला. ग्रामस्थांची समस्या गांभीर्याने ऐकून घेत आमदार सिद्धार्थ खरात यांनी तत्काळ गटविकास अधिकारी, मेहकर व विस्तार अधिकारी (पंचायत) यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून प्रत्यक्ष गावात भेट देण्याचे आदेश दिले. तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मार्फत आठ दिवसांच्या आत गावाला पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश दिले.
गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न आमदार सिद्धार्थ खरात यांच्या प्रयत्नांमुळे आता मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी अंजनी सर्कल प्रमुख पवन टाले, डॉ. शेषराव बदर, साहेबराव हिवाळे, दत्ताभाऊ घनवट, शिवाजीसोनुने, सरपंच रवीभाऊ बदर, गणेश गावंडे, नितीन ठाकरे, मनोज ठाकरे, सतीश ठाकरे, पवन ठाकरे, साहेबराव कुंभार, हरिदास कुंभार, अमोल पाटील, गजानन कुऱ्हे, विलासराव कुऱ्हे, कैलास काळे, अश्रू शिंदे, नागेश ठाकरे, संजय ठाकरे, शुभम ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.



Post a Comment
0 Comments