Type Here to Get Search Results !

मेहकरात पाखरे हॉस्पिटल शेजारील डीपीला भीषण आग आग विझविण्यासाठी नागरिकांची धावपळ

 मेहकरात पाखरे हॉस्पिटल शेजारील डीपीला भीषण आग आग विझविण्यासाठी नागरिकांची धावपळ




मेहकर: गजानन राऊत

मेहकर मध्ये डीपीला लागली आग

महावितरणवर प्रश्नचिन्ह निर्माण

मेहकर शहरातील पाखरे हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या वीज वितरण कंपनीच्या (एमएसीबी) च्या डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.


डीपीच्या अगदी शेजारी एक कार व एक लोडिंग वाहन उभे होते. सुदैवाने या वाहनांचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र डीपीमधून ओईल लिक होत असल्याने हि आग तीव्र स्वरूपात पसरत होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते


स्थानिक नागरिकांनी ततत्काळ महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती दिली, मात्र वेळेत कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. नागरिकांनी स्वतः सिलेंडरच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. पाखरे हॉस्पिटलमधूनही सिलेंडर आणण्यात आले होते, तरीही डीपी मधली ओईल लिकेजमुळे आग आटोक्यात येत नव्हती.


यानंतर उशिरा वीज वितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. परिसरातील वीजपुरवठा बंद करून डीपीवरील डीओ काढण्यात आला. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.


या घटनेमुळे विद्युत पुरवठा कर्मचारी यांचा निष्काळजीपणा की काय वेळेवर प्रतिसाद न मिळाल्याबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती

Post a Comment

0 Comments