Type Here to Get Search Results !

प्रजासत्ताक दिनी खंडाळा देवी येथे १७९ विद्यार्थ्यांची राष्ट्रध्वजाला सलामी

 खंडाळा देवी येथे १७९ विद्यार्थ्यांची राष्ट्रध्वजाला सलामी





 प्रतिनिधी:गजानन राऊत


खंडाळा देवी (ता. मेहकर) : मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, खंडाळा देवी येथे ७७वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील १७९ विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.



या प्रसंगी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांना वंदन केले. पुष्टरोगाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी संशयास्पद लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रात जाण्यास प्रवृत्त करू, अशी शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. यानंतर देशभक्तीपर भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.


कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच सौ. रेणुका रतन पाटील मानघाले, ग्रामविकास अधिकारी बावणे मॅडम, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दिपक मानघाले,उपाध्यक्ष कडुजी राऊत, उपसरपंच धनंजय मानघाले,पत्रकार गजानन राऊत,संदीप ढोरे, दत्तात्रय मानघाले,सिध्दार्थ देबाजे,संतोष ढोरे, राजु शिंदे, धनंजय राऊत,मुख्यधापक गायकी सर, ढवळे सर, चांगाडे सर, रहाटे सर, चव्हाण सर, थेटे सर, व प्रकाश काळे, शिक्षिका.ताजने मॅडम,बर्वे मॅडम,अंगणवाडी सेविका.पोपळघट मॅडम,बोराडे मॅडम,अंभोरे मॅडम,ठाकुर मॅडम, व सर्व सदस्य गट ग्रामपंचायत खंडाळा देवी, शिक्षक, पत्रकार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments