Type Here to Get Search Results !

पार्डा येथील शासकीय व गायरान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न उपोषणाचा इशारा देताच महसूल प्रशासनाकडून लेखी आश्वासन

 पार्डा येथील शासकीय व गायरान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न


उपोषणाचा इशारा देताच महसूल प्रशासनाकडून लेखी आश्वासन




मेहकर :गजानन राऊत


बुलढाणा जिल्ह्यातील

मेहकर तालुक्यातील पार्डा येथील शासकीय व गायरान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भारतीय समता संघटनेच्या वतीने अमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. उपोषणाचा इशारा मिळताच मेहकर तहसीलदारांनी हस्तक्षेप करत संघटनेला लेखी पत्र देऊन उपोषणाला न बसण्याची विनंती केली आहे.



पार्डा येथील शासकीय जमीन कसणारे शेतकरी हे अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील असून त्यांच्याकडे उपजीविकेचे कोणतेही साधन नाही. शासनाच्या विनावापर जमिनी स्वतःच्या कष्टाने लागवडीखाली आणून त्यावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.


भारतीय संविधानातील अनुच्छेद ३९ (क) नुसार गरजेची साधने पुरवण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे मत भारतीय समता संघटनेचे अध्यक्ष अम्रपाल भाऊ वाघमारे यांनी व्यक्त केले. गायरान किंवा शासकीय जमिनीवरील गरीब शेतकऱ्यांचा कब्जा व घरासाठी असलेला राहिवास कोणालाही हटवता येणार नाही. तसे केल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.


या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष वसुदेव निकाळजे, कार्याध्यक्ष शुद्धोधन गवई, भीमराव काकडे, तालुकाध्यक्ष विनोद जाधव, पी. के. शेजोळ, राजहंस पनाड यांच्यासह पार्डा येथील शासकीय जमीन कसणारे शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments