Type Here to Get Search Results !

झेंडा रोवला क्रांतीचा गीताचे शूटिंग संपन्न 7 एप्रिल ला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

झेंडा रोवला क्रांतीचा गीताचे शूटिंग संपन्न
7 एप्रिल ला येणार प्रेक्षकांच्या भेटीस




मेहकर ; प्रतिनिधी गजानन राऊत 

मेहकर :- स्थानिक विठू माऊली फिल्म्स क्रियशन च्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या येणाऱ्या जयंतीनिमित्त 7 एप्रिल ला सकाळी 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या झेंडा रोवला क्रांतीच्या हा व्हिडीओ सॉंग ची शुटींग संपन्न झाली,सदर गीताची शुटींग ही मेहकर,ग्राम पिंप्रीमाळी,केळवद,बुलढाणा,परभणी,आदी भागात पार पडली  आहे 


 सदर गीताचे बोल हे सुप्रसिद्ध गीतकार डॉ श्रीकृष्ण राऊत,तर संगीत व प्रा.डॉ.हर्षवर्धन मानकर ह्यांनी केले तर छायाचित्रीकरण प्रमोद ताजने,रामदास भगत,अमर धांगड ह्यांनी केली तसेच दिग्दर्शन ; विजय आसाराम फंगाळ ह्यांचे असून येत्या 7 एप्रिल ला सकाळी 9 वाजता हे गीत विठू माऊली फिल्म्स क्रियशन च्या अधिकृत युट्युब चॅनल ला रिलीज होईल तरी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हे गाणे शेअर करावे अशी विनंती विजय फंगाळ 

यांनी केले आहे,सदर गीता मध्ये मुख्य भूमिकेत अरुण बळी,जया बळी,नंदकिशोर कुडके,सुनिता कुडके,विजय फंगाळ,जगदीश वाळोकर,परमानंद वाघमारे,शाझ शेख,अमोल चांगाडे आदींच्या भूमिका आहेत ग्राम पिंप्रीमाळी येथे शुटींग करतांना तेथील सरपंच व कॉन्ट्रॅक्टर शाम भाऊ इंगळे ह्यांचे तसेच बुलढाणा येथे संदीप हुडेकर,तर परभणी येथे रोहित राऊत ह्यांचेमोलाचे सहकार्य लाभले आहे  तरी 7 एप्रिल ला हे गीत जास्तीत जास्त प्रेक्षकांनी शेअर करावे

Post a Comment

0 Comments