शेतरस्ता मोकळा करण्याच्या कामात अडथळा
तहसीलदारांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
मेहकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात नुसार शेतकऱ्यांचे शेत रस्ते खुले करण्यासंदर्भात मोहीम सुरु आहे. या मोहिमेतंर्गत मेहकर तहसीलदार निलेश मडके यांनी तालुक्यातील अनेक शिवरस्त्यांना मोकळा श्वास मिळवून दिला. दरम्यान, २१ मार्च रोजी शेलगाव देशमुख मंडळातील रस्ते खुले करत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे येथील शेतकऱ्याविरुद्ध तहाीलदारांच्या तक्रारीवरुन डोणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. बहूदा हा जिल्ह्यातील पहिला गुन्हा असावा.
वरुड, कनका बुद्रूक येथील गट क्रमांक १३६ मध्ये तहसीलदार निलेश मडके, तलाठी व मंडळ अधिकारी हे शेतरस्ते खुले करुन शासीकय कर्तव्य पार पाडत होते. त्यावेळ गजानन आखरे (रा.शेलगाव देशमुख) याने शेतरस्ता खुला करत असलेल्या जेसीबीसमोर उभे राहून अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांना शिविगाळ केली. एवढेच नाही तर त्यांना जीवे मारण्याची व 'तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करून घेतो', अशी धमकी देऊन तलाठी ढोले यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी तलाठी ढोले त तहसीलदार निलेश मडके यांनी डोणगाव
पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी शेतकरी गजानन आखरे याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास डोणगाव पोलीस करीत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांचे शेतरस्ते खुले होत असताना शेतकऱ्यांनी अडवणूक न करता सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी तहसीलदार निलेश मडके यांनी केले आहे

Post a Comment
0 Comments