बुलढाणा: गजानन राऊत
दिनांक १५एप्रिल २०२५ रोजी फुले आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त स्वरसम्राट ' गायन संच,मेहकर यांचा प्रबोधनात्मक गायन कार्यक्रम, धामणी (नागापूर) ता.कन्नड जि.छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झाला.
यावेळी ' स्वरसम्राट ' गायन संच,मेहकर यांनी गीतांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. कलावंतांनी महापुरुषांची गीते गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.एकता,बंधुता, सामाजिक सलोखा, फुले आंबेडकर कार्य अशा विविध प्रबोधनपर गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.
गायक शाहीर भिमराव अंभोरे, साहेबराव अंभोरे, दत्ता पवार, संदीप बोदडे, प्रियंका अंभोरे यांच्या सुरेल गायन व शेरोशायरीने उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी गायकांनी निळ्या पाखरांची वंदना भिमराया, सोनियांची उगवली सकाळ, भीम रमा ते सोन्याच्या बंगल्यात सुखाने राहले असते,घेतो मोकळा श्वास भीमजयंतीमुळे, छत्रपती शिवराया माझा,पहाट झाली प्रभा म्हणाली, साऱ्या सणात सण भारी, राही कोर्टात पहिला भीम मानाचा, डॉक्टर झाली कलेक्टर झाली अशी एक से बढकर एक गीते सादर केली.आकाश मोजतो आम्ही या गीतानंतर सरणतय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.
कोरस पंडित अंभोरे,सत्यभामा कांबळे ,आशा टेकाळे यांनी दिला.तर महाराष्ट्राचे प्रख्यात बॅन्जो वादक संदीप बोदडे,ढोलकपटू अशोक जावळे, राहुल पवार, तबलजी दिलीप अवचार आणि हार्मोनियम वादक साहेबराव अंभोरे यांच्या तालबद्ध वादनाने कार्यक्रम दर्जेदार आणि बहारदार झाला.
कार्यक्रमाच्या आयोजन व यशस्वीतेसाठी
भालेराव सर, सोनवणे सर नागापूर,मित्रमंडळ यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सामाजिक सलोख्यासाठी या गावाची ओळख आहे हे विशेष.


Post a Comment
0 Comments