डोणगाव -गजानन राऊत
पीसीपीएनडीटी च्या पथकाने पाठलाग करून पकडले शेलगाव देशमुख शिवारात गुरुवारी रात्री कारवाई. गुन्हे दाखल
देशमुख शिवरात गुरुवारी रात्री कारवाई गुन्हे दाखल करण्यात आले
देशभरात गर्भलिंग निदान व गर्भपात करण्यास बंदी असताना सुद्धा काही शिक्षण समृद्ध व पैशाचा मोह आवरले आहे जाणाऱ्या लोकांकडून बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान व गर्भपात करण्याच्या घटना घडत आहेत अशातच आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी विभागाला 17 एप्रिल रोजी मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरात गर्भलिंग निदान व गर्भपात होणार असल्याची तक्रार मिळाल्यानंतर सापळा रचून गर्भलिंग निदान करणाऱ्या एका एजंटला ताब्यात घेण्याची घटना 17 एप्रिलच्या रात्री दहा वाजता घडली.
आरोग्य विभागातील पी सी पी एन डी टी विभागास लिंगनिदान होत असल्याची खात्रीशीर तक्रार प्राप्त झाल्यानंतर, पी सी पी एन डी टी विभागाच्या लिगल कॉन्सिलर ऍड. वंदना तायडे यांनी 6 सदस्यांचे पथक तयार करण्यात केले. या पथकाने सापळा रचून एका गर्भवती महिलेला बनावट रुग्ण म्हणून वाशीम जिल्ह्यातील कुकसा फाटा येथे पाठवले. तिथे तिची भेट गजानन विठ्ठल वैद्य राहणार माझोड तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली या एजंटशी झाली, त्याने महिलेला लिंग निदानाची हमी दिली. व तिला तिथून घेऊन गाडी क्रमांक एम एच 49 ए एस 6966 डोणगाव वरून शेलगाव देशमुख रोडने गाडीत बसून नेले व सांगितले की मीच गर्भलिंग निदान करणारा डॉक्टर आहे माझ्यानंतर दुसरे डॉक्टर येतात व ते गर्भपात करतात. आरोग्य विभागाच्या पथकाने डमी रुग्ण गाडीत बसलेल्या गाडीचा पाठलाग केल्यानंतर शेलगाव देशमुख येथून परतणाऱ्या या गाडीला थांबून तपासणी केली असता त्या गाडीत NULIFE Tripal Safty चे ग्लोज चार नग, ब्लड कलेक्शन बॉटल पाच नग, DYNAPAR AQ इंजेक्शन सिरीज दहा नग , डिस्कोव्हर सिरीज 2.5 एम एल दोन नग हे गर्भपात करण्याचे साहित्य गाडीत आढळून आले .
तर कारवाईसाठी आलेल्या पथकाकडून डमी पेशंटला देण्यासाठी दिलेले पैसे हे कमी पेशंट ने आरोपी गजानन वैद्य यांच्याकडे दिल्याचे सांगितल्या नंतर आरोपी गजानन वैद्य याची झडती घेतली असता त्याच्याजवळ दोनशे रुपयांच्या 45 नोटा व पाचशे रुपयांच्या 38 नोटा असे एकूण 28 हजार रुपये गजानन विठ्ठल वैद्य यांच्यामधून मिळाले यावेळी आरोग्य विभागात च्या वतीने , एडवोकेट वंदना तायडे ,संतोष नारायण माळोदे, ज्ञानेश्वर मुळे पंच गजानन रघुनाथ शेवाळे सह वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय मेहकर डॉ. सुनीता हिवसे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली असुन यातील आरोपी गजानन वैद्य याला डोणगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय अधीक्षक मेहकर डॉ. सुनिता हिवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डोणगाव पोलिसांनी विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक गाढवे करीत आहे.
.jpeg)
Post a Comment
0 Comments