मेहकरातील व्यावसायिकांचे साखळी उपोषण खा.डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत सुटले
मेहकर :गजानन राऊत
मेहकर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम विरोधात व्यावसायिकांनी विविध मागण्यांसाठी १५ ता.पासून न.प.समोर सुरु केलेल्या साखळी उपोषणाची आज रा.काँ.खासदार डॉ. अमोल कोल्हे ,माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मेहकरचे शिवसेना आमदार सिध्दार्थ खरात यांच्या उपस्थितीत न.प. मुख्याधिकारी यांच्या आश्वासनानंतर सांगता झाली# शहरात २ एप्रिल पासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली. शहरातील मुख्य रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण प्रशासन काढत आहे. या विरोधात शिवसेनेचे शहर प्रमुख(उद्धव बाळासाहेब ठाकरे) तथा व्यावसायिक किशोर गारोळे व काही व्यापाऱ्यांनी न.प. समोर विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केले होते.विविध मागण्यात लघु व्यवसाय अतिक्रमण म्हणून बघण्याऐवजी त्यांना भाडेपट्टीवर नियमित करावे,सुरक्षित व शिस्तबद्ध व्यवसाय करणाऱ्यांना इतरत्र हलवू नये,लघु व्यावसायिक, महिला, बेरोजगार यांच्या साठी स्वतंत्र व्यवसाय झोन किंवा स्टॉल मार्केट सुरू करावे,शहरातील जी नझुल जमीन लघु उद्योजक व बेरोजगार यांना दिली होती ती पुर्ववत द्यावी,पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्याशिवाय अतिक्रमण काढू नये व चुकीचे मार्किंग झाल्याने नागरिकांना विश्वासात घेऊन कार्यवाही व्हावी व मोबदला द्यावा.या मागण्यांसाठी शहरातील व्यावसायिक किशोर गारोळे, आकाश घोडे, संदीप गवई, सुनील अंभोरे, रफिक गवळी, संदीप गारोळे, गोपाल गायकवाड, हसनभाई गवळी, मोहन सोनुने, निवृत्ती लहाने,शुभम पानखेडे,महेश गायकवाड, विलास शिंदे, अश्विन साबळे, रतन लोणकर, अमोल बोरे,गणेश गोळे, एजाज खान,अमोल मोरे, मुरलीधर गुंजकर,साजिद शेख,आकाश अवसरमोल, आरिफ शहा,सलीम शहा,शहर महिला संघटक पौर्णिमा गवई, नगमा गवळी, भागीरथी देबाजे,मालता लोणकर, सुरेखा देबाजे यांनी साखळी उपोषण सुरू केले होते# आज खासदार डॉ. अमोल कोल्हे,माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आमदार सिध्दार्थ खरात,उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी न.प.मुख्याधिकारी रामराजे कापरे सह उपोषण मंडपाला भेट दिली.यावेळी आ.सिद्धार्थ खरात बोलले की शासनाला अतिक्रमण काढण्यासाठी आमचा विरोध नाही. परंतु या व्यावसायिकांना शहरातील रिकाम्या शासनाच्या जागेवर हॉकर्स झोन तयार करा व व्यवसायासाठी द्या. अतिक्रमण काढताना शासनाने ज्याचा फोन आला ते सोडले असाही आरोप केला. तर यावेळी मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी सांगितले की हॉकर्स झोन तयार करून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. या आश्वासनानंतर खा.अमोल कोल्हे,माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आ.सिध्दार्थ खरात यांनी किशोर गारोळे यांना शरबत दिले व साखळी उपोषण सुटले. यावेळी पुढारी व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments