दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला दोषीवर कारवाई करू अशी आश्वासन प्रशासनाने दिले
मेहकर:गजानन राऊत
मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथे महामानवाच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी दोन समाजात तणाव निर्माण झाला त्यानंतर एका गटाने महापुरुषाच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या आरोपीवर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली या घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत पोलीस तैनात व बंदोबस्त करण्यात आला , सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती सूत्राने दिली आहे घटनेबाबत प्राप्त माहितीनुसार रामदास बबन चव्हाण वय ३५ रा.अंजनी बु.ता.मेहकर यांनी डोणगाव, पोलीस स्टेशनला याबाबतची तक्रार दिली १४एप्रिल रोजी रस्त्यावर लावलेल्या महामानवाच्या बॅनर प्रतिमेच्या खाली लघुशंका करून प्रतिमेची विटंबना करून धार्मिक भावना दुखावल्या अशी तक्रार दिली सदर तक्रारीवरून पोलिसांनी चार आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास डोणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय अमरनाथ नागरे करीत आहेत या घटनेचे गांभीर्य ओळखत उपविभागीय पोलीस कर्मचारी यांना तैनात करण्यात आले आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील
महसूल रवींद्र जोगी यांनी स्थानिक जनतेशी संवाद साधत शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे सदर प्रकरणात जोशी आरोपीवर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तसेच उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहे सायंकाळ दरम्यान आ.सिद्धार्थ खरात यांनी गावात जाऊन नागरिकांची संवाद साधला
या घटनेचा पुढील तपास डोणगाव पोलीस करीत आहे
या घटनेचा निषेध करत राज्य महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला या घटनेने समाजातील धार्मिक भावना दुखावल्या गेल्यामुळे एका गावातील नागरिकांनी छत्रपती संभाजी नगर ते नागपूर हा राज्य महामार्गावर रास्ता रोको केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं काही तणाव दिसून आला तर प्रशासन सुद्धा हतबल झाल्याचे दिसून आले शेवटी पोलीस प्रशासनाने जमावाला शांत करत वाहतूक सुरळीत केली मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने प्रयत्न करून वाहतूक सुरळीत केली मात्र सदर रास्ता रोको आंदोलकांनी वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांचे अनेकांचे काम सुद्धा विस्कळीत झाले व नागरिकांना प्रचंड त्रास करावा लागला पोलीस प्रशासनाने प्रचंड परिश्रम घेत वाहतूक सुरळीत केली
अंजनी बुद्रुक या गावात १४एप्रिल दिवशी दोन युवकांनी रात्रीच्या सुमारात महामानवाच्या बॅनर्जी विटंबना करण्याची घटना दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी समाज माध्यमावर वायरल व्हिडिओ मधून उघडकीताली या घटनेने गावात तणाव निर्माण झाला होता सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने धाव घेत चार समाजकंटकाला ताब्यात घेतले
सध्या अंजनी बुद्रुक गावात तणावपूर्ण शांतता आहे अंजनी बुद्रुक येथे आज १५ एप्रिल रोजी समाज माध्यमावर एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये एक समाज कंटक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनर ची, विटंबना करण्याचं दिसून आले हा व्हिडिओ पाहताच आंबेडकरी समाज बांधव यांनी मुंबई नागपूर राज्य राष्ट्रीय मार्ग बंद केला या घटनेची माहिती मिळताच डोणगाव चे ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी ताफ्यासह धाव घेत संशयित , आरोपीला ताब्यात घेतले व गावकऱ्यांची समजून , काढली व शांतता ठेवाव असे आवाहन केले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यावेळी उपस्थित होते
आता गावात तणावपूर्ण शांतता आहे

Post a Comment
0 Comments