बुलढाणा
समृद्धी महामार्गावर पुन्हा एक अपघात मालवाहू वाहनाने एका उभ्या वाहनाने ठोकले, या अपघातात एकाचा मृत्यू तर एक गंभीर समृद्धी महामार्गावर दिवसेंदिवस अपघातात सत्र सुरूच आहे या दोन-तीन दिवसात दोन-अपघात तर आज पुन्हा एक अपघात , या आधी, बोलोरो .एसटी बस आणि लक्झरी हा तिहेरी अपघात झाला होता पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर २५ पैकी सहा जण गंभीर जखमी झाले होते
त्यानंतर समृद्धी वरील लोखंडी पट्टयानी टायर फुटले थोडक्यात मोठी दुर्घटना टळली चॅनेल ३१९च्या त्या पुलावर पुन्हा डागडुजीची वेळ
रोडवेज कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले
तर आज दि, ४ एप्रिल च्या सकाळी किनगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये हाधीत समृद्धी महामार्गावर हा भिषण आपघात झाला एका मालवाहू वाहनाने एका उभ्या वाहनाला मागून येऊन ठोकले यात मालवाहू वाहनातील एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे
जखमी झालेल्या वर सध्या उपचार सुरू आहे समृद्धी महामार्गावर नागपूर कॅरीडोर वर, हा भीषण अपघात झालेला आहे चिकू घेऊन जाणारे वाहन नागपूरकडे जात होते यावेळी समोरील वाहनाला धडकून हा मोठा अपघात झाला आहे यात मालवाहू वाहनातील धनंजय गजानन तायडे यांचा जागीच मृत्यू झाला तर व प्रथमेश हिम्मतराव लहुरकर राहणार बार्शीटाकळी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस स्टेशन
मध्ये कार्यरत असलेले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या घटनेचे पंचनामे करून मृतदेह उत्तरे तपासणीसाठी पाठवण्यात आला
पुढील तपास किनगाव राजा पोलीस करीत आहे

Post a Comment
0 Comments