Type Here to Get Search Results !

शांतता असेल तरच विकास , – जिपोअ – विश्व पानसरे साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये आगामी सण उत्सवा संदर्भात शांतता बैठक संपन्न




मेहकर गजानन राऊत

 आगामी येणाऱ्या सण उत्सवा संदर्भात साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये दिनांक ४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता बैठकीचा आयोजन करण्यात आले होते .

यावेळी सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले ‘
त्यानंतर प्रास्ताविक साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी केले त्यांनी साखरखेर्डा हे ऐतिहासिक शहर असून अनेक ऐतिहासिक भौगोलिक वारसा साखरखेर्डा शहराला लाभलेला आहे साखरखेर्डा ही संतांची भूमी आहे आणि सर्व धर्माचे लोक या ठिकाणी वास्तव्य करत असतात ‘असे सांगितले ‘
त्यानंतर माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते अर्जुन गवई यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले त्यांनी समाजामध्ये जे काही चार-पाच मिरवणुकी दरम्यान समाजकंटक असतात त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली . त्यानंतर पत्रकार अस्लम अंजूम यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले ‘
त्यानंतर पप्पा पोलीस अधीक्षक बी महामुनी यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले त्यांनी सांगितलं की एक दोन घटना वगळता सर्व शांततेत पार पडत असते आणि सण उत्सव मिरवणूक साजरी करत असताना ही पोलिसांची जबाबदारी नसून सर्व नागरिकांचे सुद्धा जबाबदारी आहे . ज्या नागरिकांचं आपल्या वार्डात वस्तीत लोक ऐकतात अशांनी जे लोक आहेत त्यांची नावे आमच्याकडे द्या अशी सुद्धा महामुनी यांनी सांगितले ‘
त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ,
सण उत्सव हे सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन साजरे करावे ‘ कुण्या एका व्यक्तीकडून कुठल्याही प्रकारचे सण-उत्सव साजरे होत नसतात . महाराष्ट्र ही ऐतिहासिक भूमी आहे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी राहतात .
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल इतर जयंती असतील कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता एखाद्या वाचनालय कसे उभे राहतील यासाठी सुद्धा नागरिकांनी प्रयत्न करावा ‘ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्रिटनमधील जे घर आहे त्या ठिकाणी वाचनालय आहे ‘
जो कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे तो सर्वांसाठी आहे तो आमच्यासाठी लागू आहे . आज आम्ही येथे आहे उद्या कुठे असू हेच आम्हाला माहीत नसते , आणि जिथे शांतता असते तेथेच विकास नांदत असतो ‘ कारण ज्या ठिकाणी गालबोट लागत असते त्या ठिकाणी निधी येण्यासाठी सर्वच अडचणी निर्माण होत असतात ‘
आपण गावात एकमेकांचे प्रसन्न चेहरे रोज बघतो असे चेहरे आपल्याला बघायचे आहेत की जळणारे घर बघायचे आहेत याचा विचार नागरिकांनी करणे गरजेचे असल्याचे जिपोअ विश्व पानसरे यांनी सांगितले ,
सदर शांतता बैठकीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे ‘ अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी ‘ उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील ‘ जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव ‘भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य रावसाहेब देशपांडे ‘
साखरखेर्डा सरपंच पती अमित जाधव , माजी सरपंच कमलाकर गवई साखरखेर्डा उपसरपंच सय्यद रफीक अनिकेत सैनिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष माजी सैनिक समाजभूषण अर्जुन गवई ‘ तंटामुक्ती अध्यक्ष संतोष मंडळकर ‘
,सोसायटी अध्यक्ष ललीत शेठ अग्रवाल ‘ विकी जगताप , रामदास सिंग राजपूत ,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिलीप बेंडमाळी ‘सिताराम काळे ‘गोपाल शिराळे ‘ संदीप खिल्लारे ‘माजी सरपंच दाऊद शेठ कुरेशी ‘संग्राम सिंग राजपूत .संदीप मगर ,साखरखेडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष गवई ‘ सामाजिक कार्यकर्ते दिलीप इंगळे ‘ इतिहास अभ्यासक संतोषराव मोरे ग्रामपंचायत सदस्य देवानंद खंडागळे ‘ शुभम राजपूत , लखन ‘ यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक त्याचबरोबर पोलीस पाटील पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते ‘ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य संतोष दसरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी केले .

Post a Comment

0 Comments