बुलढाणा:गजानन राऊत
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष कराल तर मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही - रविकांत तुपकर
बुलढाणा जिल्ह्याच्या संतनगरी शेगाव येथे महेश्वरी भवन मध्ये आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळू नका असा टोलाही राज्यकर्त्यावर लगावला आहे तुपकर म्हणाले अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी लाखो शेतकरी आजही पिकविमा साठी वंचित आहे , त्यांना तत्काळ विमा संरक्षण मिळायला पाहिजे सरकारने दिलेले आश्वासन पाळून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती दिलीच पाहिजे
सोयाबीन आणि कापसाला ३हाजार प्रति क्विंटल हमीभाव परत लागू करावा जंगली जनावराच्या त्रासामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यावर उपाय म्हणून शेतीसाठी कंपाऊंड आणि शेतमजुरांसाठी सुरक्षा व्यवस्था दिली जावी , या एल्गार सभेला शेतकऱ्यांचा भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे रविकांत तुपकर यावेळी म्हणाले आहे क्रांतिकारी शेतकरी संघटना आता संपूर्ण महाराष्ट्रात आक्रमक झाली आहे आम्ही शेतकऱ्यांचे हक्क मिळवण्यासाठी झगडत आहोत मागील काही महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील दौरा करत आहे शेवटी त्यांनी सरकारला इशारा देत स्पष्ट शब्दात म्हणाले की जर
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पिक विमादिला नाही तर, मंत्र्यांना रस्त्यावर फिरणे मुश्किल करू सरकारच्याछातीवर बसून हक्काची कर्जमुक्ती मिळवून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही , यावेळी शेगाव संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
सरकारला सुबुद्धी देण्याची श्रीचरणी प्रार्थना
या मिळाव्यापूर्वी रविकांत तुपकर यांनी संत गजानन महाराज मंदिरात जाऊन श्री चे दर्शन घेतले यावर्षी पाऊस वेळेवर वेळेवर येऊ द्या, पिके चांगली राहू दे आणि शेतकऱ्यांच्या घरात चांगले उत्पन्न येऊ दे यासोबतच सोयाबीन आणि कापसाला चांगले दर देण्याची सुबुद्धी व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची सुबुद्धी या सरकारला दे अशी प्रार्थना संत गजानन महाराजयांच्या चरणी केली आहे




Post a Comment
0 Comments