रुद्ररुपी पावसाचा कहर
बुलढाणा:गजानन राऊत
मेहकर तालुक्यातील.खंडाळा देवी येथे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पावसाने रुद्र रूप धारण केले असून तालुक्यातील नदी नाल्यांना देखील मोठा महापूर आला आहे तर खंडाळा देवी. येथील जगदंबा माता मंदिर संस्थान शेजारील लागून असलेल्या कालव्याला देखील आले नदीचे स्वरूप या चालू असलेल्या पावसामुळे या कालव्याला मोठा पूर देखील आल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते या पुरामुळे गावातील खंडाळा देवी जगदंबा माता मंदिराच्या पाठीमागील मागील बाजूची ढब्बर बांधकामाची भिंत सुमारे ३०ते ४० फूट संरक्षण असलेली डब्बालकामाची भिंत या रुद्र अवतारी पावसामुळे गेली वाहून भिंतीसह मोठ्या प्रमाणावर मंदिर परिसरातील शेत जमीनिच पाण्यात खचल्या आहे. मोठ्या प्रमाणात नुस्कान देखील झालं आहे या
कालव्याच्या आजूबाजूच्या शेतांमध्येही तलावासारखे पाणी साचल्याने शेतकऱ्यांची चिंता देखील अधिकच वाढली आहे शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांवर या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. मेहकर तालुक्यातील संपूर्ण परिसरात ‘पाणीच पाणी’ असे चित्र निर्माण झाले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक बदलत्या वातावरणामुळे सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. या मुसळधार पावसामुळे जगदंबा माता देवी संस्थान या परिसरातील मंदिराच्या पाठीमागची ३० ते ४०फुटांची भिंत कोसळ्याची माहिती मिळताच
घटनास्थळी तलाठी अधिकारी
दाखल झाले असून या संपूर्ण घटनेची माहिती घेतली व काही गावातील नागरिकांना भिंत कोसळून गेल्याची माहीती होताच तातडीने घटनास्थळी धाव घेत तलाठी यांना घटनेची माहिती दिली. तलाठ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, या नुकसानीचा अहवाल लवकरच वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल, असे आश्वासन खंडाळा (देवी) येथील तलाठ्यांनी दिले आहे.यावेळी घटनास्थळी तलाठी अधिकारी , बबन मानघाले ,रतन मनघाले. शामराव मानघाले, भारत खिल्लारे, रामदास ढोरे, व
गावातील नागरीकासह अनेक ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला या घटनेचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे,


Post a Comment
0 Comments