बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातुन
बुलडाणा येथील 300फुट उंच बी.एस.एन.एल ऑफिसच्या टावर वर चढला शेतकरी
बुलढाणा मधील कोर्ट रोड जिल्हाधिकारी कार्यालय मागे असलेल्या 300 फूट उंचीच्या टॉवरवर
एक शेतकरी राजु भीमराव काकडे नावाचा व्यक्तीने, टावर वर चढुन आंदोलन सुरू केले होते परंतु बुलढाणा पोलीसांनी मोठी मशागत करून त्यांना खाली उतरवले राजु भीमराव काकडे वय वर्ष ४०हा शेतकरी येळगाव येथील रहिवासी आहे
धरणाच्या बुडीत क्षेत्रामध्ये त्याची जमीन गेलेली आहे. त्यामुळे उर्वरित जी जागा आहे त्या ठिकाणी नगरपालिकेने सौंदर्य करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र या कामाला त्याचा पूर्ण विरोध असल्याची माहिती समोर आली आहे हा शेतकरी म्हणतो की नगरपालिकेने माझ्या उरलेल्या जागेत कुठलेही काम करू नये या मागणीसाठी तो बीएसएनएल टॉवरवर चढलेला होता नगरपालिकेने त्याठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम सुरू केले आहे. सदर काम तत्काळ थांबवावे अशी मागणी करत हा युवक आंदोलन करतो पोलीस प्रशासन महसूल प्रशासन यांनी या युवकाला खाली उतरायचा आव्हान केले तुमची जी काय मागणी आसेल ती पूर्ण केली जाईल परंतु खाली उतरा
बुलढाणा पोलिसांनी या शेतकऱ्यांची मोठी मशागत करत खाली उतरवले

Post a Comment
0 Comments