गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशा या १० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाची सांगता आज बाप्पाला निरोप देऊन होते आहे.
मेहकर बुलेटिन एक्सप्रेस
खंडाळा देवी गावात गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या जल्लोषात सुरू झाली असून अनेक भाविक मिरवणुकीत सहभागी झाले आहेत
शिव गणेश मंडळाच्या वतीने आधल्या दिवशी महाप्रसादाच आयोजन करून , एक पारंपारिक पद्धतीने संकल्पना पाळली
मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत
स्थानिक महिला व पुरुषानी मोठा सहभाग नोंदवला ग्रामीण भागातील आधुनिक परंपरा जपत आज थाटामाटत बापाला मोदक लाडू अनेक कित्येक प्रकारे साहित्य बनवून , बाप्पाच्या विसर्जनाचा जल्लोष साजरा केला यावेळी बाप्पाची सर्वांनी एकाच वेळी आरती घेऊन बाप्पाची पुढील आगमनाची प्रतीक्षा घेत बापाला अखेरचा निरोप देण्यात आला
गणपती बाप्पा मोरया या जयघोषात आज अनंत चतुर्दशी दिवशी खंडाळा देवी येथे गणरायाला एका वर्षासाठी निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील इतर नदी कीणारी गणेशभक्तांनी बाप्पांच्या विसर्जनासाठी गर्दी केली आहे

Post a Comment
0 Comments