मेहकर बुलेटिन एक्सप्रेस
मेहकर :गजानन राऊत
मेहकर येथील ग्रामदेवता शीतला माता मंदिर परिसरात रस्त्याच्या मधोमध घाण पाणी साचत असल्यामुळे संतप्त नागरिकांच आंदोलन
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून साचलेल्या घाण पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील ग्रामदेवता शीतला माता मंदिर परिसर आणि श्री शारंगधर बालाजी मंदिराच्या जवळच रस्त्यावर हे घाण पाणी साचले आहे. स्थानिक नगरपरिषदेकडे अनेकदा तक्रार करूनही कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नसल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज रस्ता रोको आंदोलन केले
नगरपरिषद मुडदाबाद मुडदाबाद घोषणाबाजी करून आंदोलन सुरू केले कित्येक दिवसापासून घान पाणी रस्त्याच्या मधोमध साचतआहे यासाठी स्थानिक नागरिकांनी
मेहकर नगरपरिषद ला कित्येकदा निवेदनात तक्रारी देऊन सुद्धा कोणतीच उपयोजना केली जात नसल्यामुळे आज रस्ता रोको आंदोलन सुरू केले हे आंदोलन शिवचंद्र गणेश मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले
शिवचंद्र गणेश मित्र मंडळाचे स्थापक अध्यक्ष विनोद भिसे,संदीप तट्टे, व स्थानिक नागरिक यांच्या वतीने
रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आले सर्व घाण पाणी शितला माता मंदिरप्रवेश दारात या संपूर्ण परिसरात हे घाण पाणी साचत असल्यामुळे नागरिक झाले संतप्त नगरपरिषद ला निवेदन दिले की तातपुरत्या उपयोजना करून देतात परंतु कायमस्वरूपी उपाय योजना केली जात नाही गणेश विसर्जनात देखील घाणच पाणी आणि आता काही दिवसातच नवरात्री उत्सव सुरू होणार आहे काही दिवसात परंतु या घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे
मेहकर शहराचे आराध्य दैवत श्री शारंगधर बालाजी मेहकरच्या प्रवेशद्वाराजवळ रस्त्याच्या मधोमध घाण पाणी अनेक दिवसापासून वाहत आहे नगरपालिकेला वेळोवेळी लोकशाही मार्गाने निवेदने व तक्रारी देऊनही काहीच उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे संतप्त शिवसैनिक सह इतर नागरिक व युवकांनी आंदोलन केले यामध्ये दहावी शिकत असलेले विद्यार्थानी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले नगरपरिषद ने याकडे दुर्लक्ष करू नये याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता, असल्यामुळे नागरिक संतप्त होऊन हे आंदोलन करत आहे , याकडे, या आधी सुध्दा सर्व पक्षांनी देखील सहभाग नोंदवला होता नगरपरिषद ला वारंवार सांगून तात्पुरत्या उपयोजना केल्या जातात परंतु कायमस्वरूपी याच्यातून निवारा निघेल असे उपयोजना करण्यात यवाव अशी या स्थानिक नागरिकांची मागणी आहे
या आंदोलनामुळे
यावेळी रस्ता ज्याम होत असल्यामुळे मेहकर पोलिसांनी आंदोलन करत्यांना ताब्यात घेतले
परंतु याकडे सर्व मेहकर वाशीयांचं लक्ष लागलेले आहे
.jpg)
Post a Comment
0 Comments