मोठी ब्रेकिंग न्यूज मेहकर बुलेटिन
गजानन राऊत बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या कारवायांवर अँन्टी करप्शन विभागाने मोठा, हातोडा मारला असून मोताळा तहसीलदार हेमंत पाटील लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांनी रंगेहात पकडले आहेत हि कारवाई अकोला अँन्टी करप्शन विभागाने शनिवारी बुलढाणा जिल्ह्यात धाडसी कारवाई करून आरोपी तहसीलदाराला शेतकऱ्यांकडून लाच घेताना रंगेहात पकडले तक्रारदार शेतकऱ्यांची वर्ग २ जमीन वर्ग १ मध्ये करण्यासाठी खुद तहसीलदाराने तब्बल २ लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार मोताळा तालुक्यात उघडकीस आला अखेर शेतकऱ्यांनी अँन्टी करेप्शन विभागाकडे तक्रार दाखल केली होती या पथकाने सुयोगजित सापळा रचून तहसीलदाराच्या बुलढाणा येथील राहत्या घरी दोन लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले या कारवाईमुळे तहसील कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या कारवायांवर ताशेरे वढल्या गेले आहे जिल्ह्यातील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांना आता सत्र भोगावे लागेल अशी चर्चा सध्या बुलढाणा जिल्ह्यात सुरू आहे अँन्टी करप्शनच्या पथकांच्या कारवाईने पुन्हा एकदा प्रशासनातील भ्रष्टाचाराचे नुसतं नाबुत केले आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला यांनी केली आहे बुलढाण्यात मोठी कारवाई समजली जात आहे

Post a Comment
0 Comments