मेहकर बुलेटिन एक्सप्रेस :गजानन राऊत बुलढाणा
मेहकर:दि १६ सप्टेंबर २०२५
खानापूर गावात स्मशानभूमी नसल्यामुळे भर पावसात मंडपाच्या पाईपाच जुगाड करून अंतिम संस्कार करायची वेळ ग्रामस्थांनावर आली आहे हे गाव महाराष्ट्रात आहे की महाराष्ट्र बाहेर असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहे
बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील खानापूर हे गाव, मेहकर पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे गावातील नागरिकांचा सवाल थेट सरकार ला जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या ग्रामपंचायतीच्या बाहेर आहे का हे गाव की गावाला स्मशानभूमी नाही गावातील अंतिम संस्कार करण्यासाठी जागा व स्मशानभूमी नसल्यामुळे मृत व्यक्तीचा उघड्यावर, मंडपाचं शेड उभा करून काहीतरी जुगाड करून हा अंतिम संस्कार करावा लागतो खंडाळा गट ग्रामपंचायत मध्ये येत असलेलं गाव खानापूर येथे स्मशानभूमी नसल्यामुळे अंतिम संस्कार करायची वेळ उघड्यावर आली आहे अंतिम संस्कार करण्यासाठी मंडपाचे पाईप लावून हा अंतिम संस्कार करावा लागत आहे संतप्त नागरिकांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे
स्वस्त धान्य दुकानदार रमेश उत्तम डहाळे यांची आईच निधन झालं होतं परंतु कित्येक वर्षापासून गावाला स्मशानभूमी नसल्यामुळे काल मुसळधार पाऊस चालू असताना खंडाळा येथील रहिवासी सागर मानघाले यांच्या मंडप डेकोरेशनचे पाईप नेऊन तात्पुरती स्मशानभूमी
बनवण्यात आली व अंतिम संस्कार करण्यात आला खानापूर ग्रामस्थांनी स्मशानभूमीची गावकऱ्यांच्या वतीने मागणी सुद्धा केली
लवकरात लवकर स्मशानभूमी बांधून देण्यात यावी अशी मागणी खानापूर गावकऱ्यांची होत आहे
गावाला अजून कोणत्या नेत्यांनी व पुढाऱ्यांनी किंवा शासकीय लोकांनी गावकऱ्यांच्या सुख सुविधा सोडा भेट सुद्धा दिली नाही असा आरोप देखील ग्रामस्थानाकडून होत आहे
कित्येक दिवसापासून गावकरी संतप्त होत आहे जिल्ह्याचे तालुक्याचे व ग्रामपंचायतचे पुढारी नेते मंडळी आहे यांनी कृपया गावासाठी उपाययोजना करावी अशी विनंती खानापूरातील गावकरी करीत आहे

Post a Comment
0 Comments