मेहकर:गजानन राऊत
खंडाळा
काल पासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि राज्यांमध्ये प्रमुख मंदिरामध्ये उत्सव पाहायला मिळते
बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे नवरात्री उत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे नवरात्र उत्सवानिमित्त खंडाळा देवी जय जगदंबा माता देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी होते नऊ दिवस उपासना करून भाविक रोज सकाळपासून मंदिराच्या गाभाऱ्यात हजेरी लावतात जय जगदंबा देवी संस्थान मंदिराच्या परिसरामध्ये जयत तयारी पाहायला मिळते जय जगदंबा देवीच्या गाभाऱ्यात विनीगत देवीची पूजा केली जाते रात्री आठ वाजेपासून जगदंबा माता व रेणुका माता देवीच्या आरती साठी सुरुवात होती हजारो भाविकांच श्रद्धास्थान खंडाळा देवी आराध्य दैवत नवसाला पावणारी आदिशक्ती आदीमाया म्हणून प्राचीत असलेली खंडाळा देवी येथील आई इसाई माय जय जगदंबा माता आणि आई रेणुका देवी मंदिरात २२ सप्टेंबर पासून घटस्थापना करून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात करण्यात आली यंदा दहा दिवसांचा नवरात्र उत्सव साजरा होत आहे
त्यानिमित्त जय जगदंबा संस्थानच्या वतीने जयत तयारी करण्यात आली
२२ सप्टेंबर रोजी सकाळी देवीची पूजा करून या नवरात्र उत्सवाला प्रारंभ केला ही पूजा जय जगदंबा संस्थानचे मानकरी व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे
विविध प्रकारे देवीचा सिंगार करून देवीच्या गळ्यामध्ये नोटांचा हार चढून देवीची घटस्थापना करून आरती ला सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थांनचे मानकरी व गावातील महिला व नागरिक या आरतीमध्ये सहभागी झाले हा संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात नाहुन गेला

Post a Comment
0 Comments